Court sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कुंभारेला 2 वर्षांची सक्तमजुरी; न्या. पठारे यांचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील साक्री रोड परिसरात मध्यरात्री बिअर देण्यास नकार दिल्यामुळे व्यवस्थापकावर तीक्ष्ण हत्याराने वार करणाऱ्या ‍आरोपी दीपक कुंभारे याला दोषी ठरविण्यात आले. तसेच त्याला दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पठारे यांनी हा निकाल दिला. (Accused Deepak Kumbhare was sentenced to hard labor for 2 years by District Sessions Judge dhule news)

साक्री रोडवरील बिअर बारवर जयेश विजय भोपे व्यवस्थापक होते. बार बंद करून ते बाहेर थांबले होते. या वेळी दीपक अनिल कुंभारे आला. त्याने बिअरची मागणी केली. मध्यरात्र व बार बंद असल्याचे कारण त्यांना सांगण्यात आले. यानंतर जयेश भोपे घराकडे जात असताना दीपक मागून आला. त्याने भोपे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला.

हा हल्ला २२ मार्च २०१६ ला झाला होता. या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समक्ष कामकाज सुरू झाले. मात्र, गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे दीपकची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे तक्रारदार भोपे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. न्या. पठारे यांच्या समक्ष कामकाज सुरू झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील भारत भोईटे यांनी बाजू मांडली. उपलब्ध पुरावे व संदर्भावरून दीपक कुंभारे याला दोषी ठरवण्यात आले. तसेच त्याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानी यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT