Nandurbar News : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अखेर बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले असून, सर्वपक्षीय १८ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. (All party leaders succeed in unopposed election of taloda market committee nandurbar new)
त्यात भाजपला नऊ, राष्ट्रवादीला सहा, काँग्रेसला एक, शिंदे गटाला एक व ठाकरे गटाला एक जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. २०) तब्बल ३३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागल्याचे बोलले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १८ जागांसाठी तब्बल ८६ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. सर्वच पक्षांतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने डोकेदुखी वाढली होती. दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांचे एकमेकांना फार्म्युल्यांवर फॉर्म्युले पाठविले जात असल्याचे बोलले जात होते. त्यात शेवटी एकमत होऊन माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३३ जणांनी माघार घेतली.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी आमदार राजेश पाडवी व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. त्यामुळे भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे एक, शिवसेना शिंदे गट एक व ठाकरे गटाचा एक संचालक बिनविरोध निवडल्याचा दावा केला जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन खैरनार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगलसिंग पावरा यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे
सहकारी संस्था सर्वसाधारण प्रवर्गातून इंद्रजित सुरेश झगडू, योगेश प्रभाकर चौधरी, अमृत तुकाराम मराठे, कल्पेश धरमदास माळी, प्रकाश श्रीराम माळी, रेखा रमेश माळी, हितेंद्र सरवनसिंग क्षत्रिय, महिला राखीव प्रवर्गातून कल्पनाबेन रघुवीर चौधरी, लताबाई प्रल्हाद मराठे, इतर मागास प्रवर्गातून शशिकांत जगन्नाथ वाणी व अनुसूचित जमाती प्रवर्गातून राजेश उदेसिंग पाडवी यांची निवड झाली.
ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण प्रवर्गात नीरज सुरेश पाटील, अमोल प्रल्हाद भारती, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रोहिदास श्यामा पाडवी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून सत्तरसिंग भीमसिंग राजपूत, व्यापारी व अडते प्रवर्गातून गौतमचंद अनोपचंद जैन, निखिलकुमार नेमीचंद तुरखिया आणि हमाल व तोलारी प्रवर्गातून रवींद्र सदाशिव गाढे अशा सर्वपक्षीय १८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.