Balasaheb Thorat esakal
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : भाजपच्या धोरणामुळे शेतकरी उद्‍ध्वस्त : बाळासाहेब थोरात

G44684

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : भाजप (BJP) सरकारने शेतकरी विरोधी कायदे करून बाजार समित्या व शेतकऱ्यांना संपविण्याचे काम चालविले आहे. भाजपच्या कृषीविरोधी धोरणामुळे शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे. (Balasaheb Thorat statement about Farmers ruined due to BJP policy dhule news)

आज नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना अद्यापही राज्यातील भाजप-शिंदे सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे धुळे बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी भाजपच्या पॅनलला त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे.

त्यासाठी महाविकास आघाडीने एकतेची वज्रमूठ घट्ट केली आहे. मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन काँग्रेसचे राज्यविधी मंडळ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे केले.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीचा रविवारी (ता. ९) सकाळी दहाला नकाणे (ता. धुळे) येथील दुलारी गार्डन येथे मेळावा झाला. श्री. थोरात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या प्रसंगी श्री. थोरात म्हणाले, की धुळे बाजार समिती माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात अव्वल आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन काळे कृषी कायदे केल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळ आंदोलन करावे लागले. या आंदोलनात तब्बल ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला.

शेतकरीविरोधी धोरण राबवून भाजप सरकार शेतकरी आणि बाजार समित्या उद्‍ध्वस्त करण्याचे काम करत आहे. आजही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी धुळे बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलला जागा दाखविणे गरजेचे आहे. मतदारांनी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील मविआ पॅनलमागे खंबीरपणे उभे राहावे.

जाण असणारेच उमेदवार देऊ

आमदार कुणाल पाटील म्हणाले, की धुळे बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी उपबाजार समित्या, गुरांच्या शेणापासून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा संकल्प होता. मात्र, राज्यात सरकार बदलल्याने सर्वच योजनांना अडविण्याचे काम त्यांनी केले. मात्र, यापुढे शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडींच्या संकल्पनेतील उत्तम बाजार समिती घडविण्याचे काम केले जाईल.

या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची जाण असणारे उमेदवार उभे केले जातील. मेळाव्यात माजी आमदार प्रा. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शिवसेना (उबाठा)चे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनीही मार्गदर्शन केले. अ

तुल सोनवणे, लता पाटील, अश्‍विनी पाटील, रणजित भोसले, जोसेफ मलबारी, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, साहेबराव खैरनार, लहू पाटील, भिका पाटील, डॉ. ममता पाटील, गायत्री जयस्वाल, शुभांगी पाटील, डॉ. अनिल भामरे यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

SCROLL FOR NEXT