Accident sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : सोनगीर येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर सोनगीर ते बाभळे फाटादरम्यान आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ४) रात्री आठच्या सुमारास घडली. कैलास बाबूराव बिरारे (वय ४७, रा. शेल्टी, ता. शहादा) असे मृताचे नाव आहे.

मृत बिरारे नरडाण्याकडून सोनगीरकडे येत होते. या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांत आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.(Bike rider killed in accident dhule news)

सोनगीरपासून दोन किलोमीटरवर शिरपूरकडून भरधाव येणाऱ्या आयशर (एमपी ४६, एच ०४९०)ने प्लॅटिना मोटारसायकल (एमएच ३९, एच १२४६)ला मागून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार कैलास बिरारे गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक देशमुख यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

उमाकांत दिगंबर ब्राह्मणे (रा. सारंगखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसांत आयशरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सदेसिंग चव्हाण, पोलिस किरण पारधी करीत आहेत.

अपघाताची खबर मिळताच नातेवाईक व शेल्टी ग्रामस्थांनी सोनगीर ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मृत बिरारे यांचे शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शेल्टी येथे अंत्यसंस्कार झाले.

त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सुरेश लोटन मोरे यांचे ते शालक, तर मंडळाधिकारी नीलेश मोरे यांचे मामा होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT