Rahul Patil
Rahul Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या एकुलत्या एक मुलाला ब्लडकॅन्सर; पालक सैरभैर!

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : कवी दिलीप पाटील यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य आहे. मिळेल ते काम करायचे अन् कुटुंबाचा गाडा हाकायचा.

त्यांचा एकलुता एक मुलगा राहुलही दहावीपासूनच मोलमजुरी (labour) करून कुटुंबाला हातभार लावत आहे. (Blood cancer in only child who support family through wage labour parents appeal for help dhule news)

काम नसेल तर पिता-पुत्र बॅंड पथकामध्ये जाऊन वाद्य वाजवितात. राहुल हरहुन्नरी आहे. कुटुंबाला पुढे नेण्याची धमक आहे. पण... राहुलची तब्येत बिघडली आणि त्याला ब्लडकॅन्सर असल्याचे निदान झाल्याने पालक सैरभैर झाले आहेत. पाटील कुटुंबाची पायाखालची जमीनच सरकली आहे. उपचारासाठी हवेत पंधरा ते वीस लाख... पाटील कुटुंबाला हवीय मदत... त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

येथील दिलीप पाटील कवी म्हणून ओळखले जातात. त्यांना काव्य करणे अन् काव्यसंमेलनात सहभागी होण्याचा छंद आहे. मोलमजुरी करून संसार सुरू आहे. त्यांना राहुल हा एकमेव मुलगा आहे. राहुललाही दहावीपासूनच गरिबीची जाणीव झाली अन् शनिवार व रविवारसह दिवाळी, उन्हाळी सुटीत मिळेल ते काम करणे, आई-वडिलांना मदतीचा हात देण्यासाठी धडपड असतो. राहुल सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल पाटील अचानक आजारी पडला. थोड्याफार उपचाराने फरक पडला नाही म्हणून त्याला धुळ्यातील रुग्णालयात दाखल केले. विविध चाचण्या केल्यात. त्यास ब्लडकॅन्सर असल्याचे निदान झाले. या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. उपचारासाठी पंधरा ते वीस लाख उभे कसे उभारावेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

होय, मला जगायचेय

राहुल गंगामाई महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्याला शिक्षण पूर्ण करून व्यवसाय अथवा नोकरीला लागायचे. आई-वडिलांना विश्रांती द्यायचीय. ब्लॅडकॅन्सरने तो खचलाय. त्याला उमेद देण्याचा प्रयत्न त्याचे मित्रपरिवार करीत आहे. त्याला जगायचेय अन् शिकाचेय, असे तो मित्रपरिवाराला सांगतोय.

मदतीचा हात हवाय राहुलला

राहुल पाटीलवर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार परवडणारे नसल्याने त्यास घरी आणले. उपचाराच्या मदतीसाठी पुढे येण्याची विनंती त्याचे वडील दिलीप पाटील यांनी केली आहे. मदतीसाठी संपर्क : दिलीप हिरामण पाटील, मु. पो. कापडणे, ता. जि. धुळे (९६७३३ ८९८७३), खाते क्रमांक ः बँक ऑफ महाराष्र्ट : ६०१०८६६५५१५, IFSC : MAHB००००५४४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT