Revolver-police 
उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना माहिती देताना..पोलिस अधिकाऱ्याच्या हातूनच सुटली गोळी..अन् धक्काच...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन अर्थात्‌ रेझिंग डेनिमित्त उपनगर परिसरातील एका शाळेत विद्यार्थ्यांना रिव्हॉल्व्हरची माहिती देत असताना पोलिस अधिकाऱ्याच्या हातून चुकून गोळी सुटली. या गंभीर घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; परंतु अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली होती. 

"रेझिंग डे'च्या कार्यक्रमात असा घडला प्रकार...

रेझिंग डेनिमित्त गुरुवारी (ता. 2) पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस ठाण्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर काही अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये भेट देत पोलिसांच्या कामकाजासह बाललैंगिक अत्याचार, सायबर क्राइमची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत नारायण बापूनगर येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या अभिनव आदर्श मराठी शाळेत दुपारी साडेचारच्या सुमारास उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहोकले पथकासह गेले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांना माहिती देत असतानाही त्यांच्या कंबरेला रिव्हॉल्व्हर होते. विद्यार्थ्यांना पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरचे नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे रोहोकले रिव्हॉल्व्हर काढून त्याची माहिती देत होते. त्याच वेळी त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हरची कळ दाबली गेली आणि लोडेड असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली. सुटलेली गोळी शाळेच्या छताला लागली. मात्र अचानक झालेल्या या घटनेमुळे शाळेत अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थीही घाबरून गेले होते. 

उपनगर पोलिस निरीक्षकावर कारवाईची शक्‍यता 

या घटनेत गोळी छताला लागल्याने मोठा आवाज झाला. छताला दोन छोटी भोकेदेखील पडली. या वेळी काहीसा धूर अन्‌ जळकट दुर्गंधी पसरली होती. नववी, दहावी अ आणि ब तुकडीमधील विद्यार्थ्यांना सुरक्षेविषयी काळजी कशी घ्यावी, तसेच मुलींना छेडछाडीच्या घटनेला सामोरे जावे लागल्यास त्यापासून सुटका कशी करून घ्यावी, या विषयाचे धडे विद्यार्थ्यांना पोलिस देत होते. यादरम्यान विद्यार्थ्यांना रिव्हॉल्व्हरची माहिती दिली जात होती. 

डमी गोळीबाबत उलटसुलट चर्चा 
दरम्यान, शाळेत घबराट पसरल्याने पालकांनी याबाबत चौकशी केली असता, रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी डमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थी-पालकांत उलटसुलट चर्चा होती. गोळी डमी असेल, तर छताला भोक कसे पडले? शाळा अन्‌ पोलिस खऱ्या घटनेवर पांघरूण घालत आहेत, असे बहुतांश पालक वर्गाचे म्हणणे आहे. श्री. रोहोकले यांना विचारले असता, त्यांनी शाळेत कार्यक्रम झाल्याचे मान्य केले. पण, रिव्हॉल्व्हरमधून सुटलेल्या गोळीबाबत ठोस उत्तर मात्र दिले नाही. 

हा मिसफायरचा प्रकार... 
उपनगर येथे मिसफायरचा प्रकार घडला आहे. त्याबाबत माहिती मागविली आहे. नेमका प्रकार कसा झाला हे समजेल. त्यानंतरच त्यावर ठोस बोलता येईल. - विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Solapur News : शेतकऱ्यांच्या तक्रारीला यश; आमदार खरे यांच्या हस्तक्षेपाने लांबोटी विद्युत केंद्रातील अभियंता निलंबित!

Latest Marathi News Live Update : महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

SCROLL FOR NEXT