esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नगरसेवकांना लागले ‘निवडणुकीचे वेध’

सकाळ वृत्तसेवा

धुळे : आमच्याकडे आता वेळ कमी आहे, त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना, तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्‍यक कार्यवाही करणे, तक्रारींचे निरसन करणे, कामांची प्रशासकीय (Administrative) कार्यवाही जलद गतीने पूर्ण

करण्याची अपेक्षा स्थायी समिती सभापतींसह सदस्यांनी आपल्या पहिल्याच सभेत बोलून दाखविली. (Chairmans warning to administration that work problems be resolved immediately in Standing Committee meeting dhule news)

एवढेच नव्हे तर पुन्हा निवडून येण्यासाठी सभापती या नात्याने आम्हाला तुमची मदत अपेक्षित असल्याचेही सभापतींना उद्देशून सदस्य म्हणाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आता आगामी महापालिका निवडणुकीचे वेध लागल्याचे संकेत मिळाले.नव्याने गठित स्थायी समितीची पहिलीच सभा गुरुवारी (ता. १६) महापालिका सभागृहात झाली.

नवनिर्वाचित सभापती किरण कुलेवार, आयुक्त देवीदास टेकाळे, मूल्य निर्धारण व कर संकलन अधिकारी तथा प्रभारी नगरसचिव पल्लवी शिरसाट, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. पहिल्या सभेच्या अजेंड्यावर केवळ समितीच्या साप्ताहिक सभेचा वार व वेळ ठरविण्याचा विषय होता.

चर्चेअंती सदस्यांनी एकमताने साप्ताहिक सभा दर गुरुवारी सकाळी अकराला घेण्याचे निश्‍चित केले. दरम्यान, हा एकमेव विषय अजेंड्यावर असल्याने पाच मिनिटांत सभा संपेल अशी अपेक्षा होती. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अत्यंत कमी कालावधी बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर सभापतींसह सदस्यांनी या पहिल्या सभेचाही उपयोग करून घेतल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सभापतींचा इशारा

नवनिर्वाचित सभापती श्रीमती कुलेवार यांनी प्रारंभीच शहरातील मूलभूत सोयी-सुविधा, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छता याकडे आमचे विशेष लक्ष असणार असल्याचे सांगितले. सर्वांना सोबत घेऊन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सभेत सदस्यांकडून मांडलेल्या सूचना या पहिल्या आणि शेवटच्या समजून कामे मार्गी लावावीत. ही सूचना समजा की इशारा समजा, असेही त्यांनी बजावले. आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याच्या अनुषंगाने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करण्याचा त्यांचा संकेत होता.

कामासाठी सदस्यांची तगमग

भाजपचे सदस्य सुनील बैसाणे यांनी सभापती श्रीमती कुलेवार यांना सभापतिपदाबद्दल शुभेच्छा देत महापालिकेची निवडणूक आता जवळ असल्याने आपल्याला २०-२० क्रिकेट नव्हे तर दहा-दहा षटकांचा सामना खेळून जास्तीत जास्त रन करावे लागणार असल्याचे सांगितले.

महिला सभापती म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सदस्य हर्षकुमार रेलन यांनी महापालिकेच्या बजेटच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सभापती श्रीमती कुलेवार यांनी विषयावर बोलण्याचा आग्रह धरला. त्यातून दोघांमधील मतभिन्नता समोर आली. मात्र, श्री. रेलन यांनी आपल्याला आता अजिबात वेळ नसल्याने आम्हाला बोलावेच लागेल, असे म्हणत आपले मुद्दे मांडले.

सदस्य नरेश चौधरी यांनी हद्दवाढ भागात लक्ष द्यावे, आम्हाला पुन्हा निवडून येण्यासाठी तुमची मदत होणार आहे, असे सांगितले. काँग्रेसचे सदस्य साबीर शेठ यांनी निधी वितरणासह कामांची प्रशासकीय कार्यवाही जलद गतीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. वसीम अन्सारी, नाजियाबानो पठाण, कल्याणी अंपळकर यांनीही मत मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT