Congestion of vehicles due to unruly parking in the bus stand area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बेशिस्त पार्किंग नेहमीचीच डोकेदुखी; लहान-मोठे अपघात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बसस्थानक व परिसर ते विश्वनाथ चौक, तसेच सटाणा रोडवरील साईबाबा कॉलनी ते सामोडे चौफुली रस्त्यावर व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांचेही वाहन रस्त्यावर पार्किंग केले जात असल्याने रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

त्यातून लहान-मोठे अपघात होत असतात. या परिसरातील बेशिस्त वाहतूक व पार्किंगचा कायमचाच बंदोबस्त होणे आवश्यक आहे.(citizens face problems due to traffic dhule news)

मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील रस्तेही आता तोकडे ठरू लागले आहेत. त्यातच बेशिस्त वाहतूक व बेशिस्त पार्किंग पद्धतीने तर शहरवासीयांची नाकेनऊ आली आहे. हा परिसर म्हणजे शहरातील मुख्य रस्ता मानला जातो.

या परिसरात बसस्थानक, ग्रामपंचायत इमारत, मुख्य बाजारपेठ, बँका, विविध प्रकारचे व्यापारी व्यावसायिकांचे दुकाने, हॉटेल्स आदी आहेत. शहरातील प्रतिष्ठित दवाखाने, शाळा-महाविद्यालयांकडे जाण्यासाठीही हाच मुख्य मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कधी कधी या रस्त्यावरील दोन मिनिटाचे अंतरही पार करणे जिकिरीचे ठरते.

बेशिस्तीने वाहनांची पार्किंग करणे, मनाला पटेल तशा दुचाकी उभी करणे, रस्त्यावरच कार पार्किंग करणे या कारणांनी येथे वाहतुकीची कोंडी होते. तसे पाहिल्यास ही कोंडी सुटू शकते. मात्र त्यासाठी या परिसरातील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक व या परिसरात वाहने लावणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

व्यापारी गाळे आहेत मात्र पार्किंग नाही. तसेच नवा मोठ्या पूल तर थेट सामोडे चौफुलीपर्यंत दोन्ही बाजूला भाजी व इतर साहित्य विक्रेते आपले दुकाने थाटून बसतात. तेथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यांचे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. तीच परिस्थिती बसस्थानक ते विश्वनाथ चौक व साईबाबा कॉलनी बसस्थानक या भागात वाहने रस्त्यावर लावलेली असतात.

त्यामुळे या भागात जाण्या-येण्यासाटीही तारेवरची कसरत करावी लागते. या भागात दुचाकीचा विळखा या रस्त्यावर कायमचीच डोकेदुखी ठरली आहे. बेशिस्त वाहतुकीला व बेशिस्त वाहन लावणाऱ्यांना पोलिसांनी वाहतुकीचा नियमांचा झटका दाखविणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C.P. Radhakrishnan Vice President of India : सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन १७वे उपराष्ट्रपती

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

SCROLL FOR NEXT