Theft esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : कडाक्याच्या थंडीत नागरिकांना चोरट्यामुळे हुडहुडी; पोलिसांपुढे मोठे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी, पोलिस कवायत मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया सुरू असताना चोरट्यांनी घरफोडीच्या माध्यमातून प्रशासनाला आव्हान दिले आहे. आर्वी (ता. धुळे), पिंपळनेर, बेहेड (ता. साक्री), दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथे घरफोडी करत चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.

आर्वी येथील सिद्धिविनायक कॉलनीतील अंगणवाडी शिक्षिका अर्चना प्रमोद वाडिले यांच्याकडे चोरट्यांनी ३ जानेवारीला घरफोडी केली. वाडिले कुटुंब सप्तशृंगगडावर दर्शनासाठी गेले. त्यांच्या बंद घरात हातसफाई करत चोरट्यांनी कपाटातून ३५ हजार रुपये, सोन्याचे कानातले, ब्रेसलेट, चांदीची चेन, पाटल्या, पॅडल लंपास केले.

आर्वीतील योगेश्‍वर कॉलनीत वासुदेव महाराज यांच्याकडील चोरट्यांनी १७ हजार रुपये व दागिने लंपास केले. या प्रकरणी अर्चना वाडिले यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरवाडे शिवारातून चोरट्यांनी टॉवरच्या २४ बॅटऱ्या लंपास केल्या. या प्रकरणी सुनील खंडूजी खेमनार (वय ३९, रा. स्वामी नारायण कॉलनी, पारोळा रोड, धुळे) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

साक्री तालुका

पिंपळनेर शहरातील हरिओमनगरात दिलीप आनंदा महाजन (वय २५) यांच्याकडे १ जानेवारीला चोरी झाली. यात घरातून एक लाख ७७ हजारांची रोकड लंपास केली. पिंपळनेरला गुन्हा नोंद झाला. बेहेड येथील प्रकाश श्रीराम तोरवणे (वय ५७, ह.मु धनदाई कॉलनी, खुटवडनगर, नाशिक) या शेतकऱ्या‍चे गावातील घर चोरट्यांनी फोडले. रोकडसह २५ हजाराचे दागिने नेले.

शिंदखेडा तालुका

विखरण (ता. शिंदखेडा) शिवारातील गट क्रमांक १६१ मधून चोरट्यांनी वीज कंपनीचे सिमेंटचे पोल तोडून लघुदाब वाहिनीचे अ‍ॅल्युमिनिअमची अठराशे मीटर तार, लोखंडी बॅकेट, लोखंडी चॅनल व इतर इलेक्ट्रिक सर्किटच्या वस्तू लंपास केल्या. तसेच कापसाचीही चोरी केली. तसेच बोलण्यात गुंतवून शेतकऱ्याचे ३० हजार रुपये लांबविण्यात आले. होळ (ता. शिंदखेडा) मार्गावर टेंभलाय शिवारात ही घटना घडली.

शेतकरी साहेबराव शंभू पाटील (वय ७०, रा. नरडाणा) ३ जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास जात असताना दुचाकीवरील दोन अनोळखी संशयितांनी शेतकऱ्यास थांबविले. बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील ३० हजारांची रोकड नेली. या प्रकरणी शिंदखेड्याच गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT