fire  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Wax Factory Fire : मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडुन 'इतकी' मदत जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Wax Factory Fire : जिल्ह्यातील वासखेडी (ता. साक्री) शिवारातील स्पार्कल कॅण्डलच्या (मेणबत्ती) कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. (CM Eknath Shinde announced an aid of 5 lakh rupees to relatives of dead people in wax factory fire dhule news)

या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

वासखेडी शिवारात मंगळवारी (ता.१८) दुपारी दोनला ही घटना घडली. अन्य एक महिला गंभीर जखमी आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शोकप्रकट करत मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदनाही व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत, तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

पालकमंत्र्यांकडून शोक

घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली.

त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सात्वंन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना यंत्रणेला दिल्यात. तसेच मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

गावित यांची मागणी

तत्पूर्वी, दुपारी आमदार मंजुळा गावित यांनी वासखेडी येथील घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाइकांसह जखमींच्या मदतीसाठी सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी शासनाकडे केली. घटनेची माहिती मिळताच साक्री तहसीलदार श्रीमती गांगुर्डे यांना तातडीने

घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करण्याची सूचना आमदार सौ. गावित यांनी दिली. मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सानुग्रह अनुदान मंजूर करावे आणि जखमींच्या औषधोपचारासाठी तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार सौ. गावित यांनी शासनाकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT