Dhule Agriculture News : शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्याच्या अडीच एकर क्षेत्रावरील केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बागमध्ये जनावरे चारण्यासाठी सोडण्याची वेळ शेतकऱ्याने आली.
यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला असून, संबंधितांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (CMV disease outbreak on banana crop dhule agriculture news)
शहादा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी रोपांची लागवड केली. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी नरसई सखाराम पाटील यांनीदेखील आपल्या अडीच एकर क्षेत्रात लागवडीसाठी नाशिक येथील एका कंपनीतून सुमारे तीन हजार २०० रोपे प्रतिरोप १५ रुपये किमतीची मागविली होती.
ही रोपे जुलैमध्ये लागवड करण्यात आली होती. लागवड करून तीन महिने रासायनिक खताबरोबर निंदणी आदी खर्च केला; परंतु अडीच एकर क्षेत्रावरील केळी पिकावर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विविध उपाययोजना करूनदेखील केळीच्या बागा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसून ब्राह्मणपुरी येथील शेतकरी नरसई सखाराम पाटील यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेवर जनावरे सोडून रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आली आहे.
त्यांनी केळीच्या बागेसाठी आतापर्यंत केलेला सुमारे दोन लाखांचा खर्च वाया गेल्याने ते कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. संबंधितांनी केळी उत्पादक शेतकऱ्याला मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कंपनीने बोगस रोप दिल्याचा आरोप
नरसई सखाराम पाटील यांनी नाशिक येथील कंपनीकडून मे महिन्यात लागवडीसाठी केळीची रोपे मागविली. नंतर पुन्हा आपल्या अडीच एकर क्षेत्रात जुलै महिन्यात लागवडीसाठी सुमारे तीन हजार दोनशे रोपे मागविली होती. जुलै महिन्यात लागवडीसाठी आणलेली रोपे कंपनीने बोगस दिल्यानेच केळी पिकावर रोग आल्याचा आरोप शेतकऱ्याने केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.