lady harrasment 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

ती म्हणाली " माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू"..तरीही पतीने....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माहेरची परिस्थिती गरीब आहे. पैसे कोठून आणणार असे सांगितल्यानंतर सासरकडील लोकांनी मारण्याचा दम दिला. छळ करून घराबाहेर हाकलून दिले. दरम्यान, माहेरून घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत तसेच पतीला नवीन दुचाकी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आणले नाहीत, म्हणून तिचा वारंवार छळ करण्यात आला.

अशी घडली घटना...

माहेरून घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणले नाहीत, यावरून नुरजहॉ मोहंमद फरीद (वय 25, रा. दोंडाईचा, मालेगाव) यांचा छळ करणाऱ्या पती मोहंमद फरीद रमजान अली (रा. दोंडाईचा) याच्यासह सहा जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल झाला. पैशासाठी छळ सुरू झाल्यानंतर माहेरची परिस्थिती गरीब आहे. पैसे कोठून आणणार, असे सांगितल्यानंतर सासरकडील लोकांनी मारण्याचा दम दिला. छळ करून घराबाहेर हाकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी पती मोहंमद, नणंद रफिका, नंदोई शरीफ सुलेमान, मामसासरे सलीम इसहाक, अक्रम मौलाना व इफ्तेकार अहमद या सहा जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आहे. 

दोन घटना..गुन्हा एकच.. पती, सासू-सासरे आदींवर गुन्हा दाखल

दरम्यान, माहेरून पतीला नवीन दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपये आणले नाहीत, म्हणून सविता गरुड (वय 22, हल्ली रा. चंदनपुरी) यांचा छळ करणाऱ्या पती शिवाजी गरुड, सासरे भीमराव गरुड (रा. वरंडीपाळकर वस्ती, देवळा) यांच्यासह चौघांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव, लोकेश राहुल सरावाला आलेच नाही; दुसऱ्या सामन्याला मुकणार? प्रशिक्षकाने Playing XI बाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

मुन्नाभाई M.B.B.S. मधली सुमन आठवतेय? 45 व्या वर्षीही सिंगल आहे ग्रेसी सिंह, आता काय करते?

Mumbai News: जमीन योग्य प्रक्रियेविना वापरू नका, धोबीघाटाच्या पुनर्विकासावरुन न्यायालयाने महापालिकेला सुनावले

Marathi News Live Updates : पॅलेट गनच्या गोळ्यांवरून राहुल गांधी आक्रमक; ‘एफआयआर नोंदवल्याशिवाय येथून हलणार नाही’

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

SCROLL FOR NEXT