Farmers Tushar Patil and Lahu Patil plucking cotton leaves after one and a half months of cultivation due to reddening and fungus.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Cotton Crop Disease : 7 बिघ्यांतील कपाशी उपटून मक्याची पेरणी; युवा शेतकरी तुषार पाटील यांना अश्रू अनावर

सकाळ वृत्तसेवा

Cotton Crop Disease : येथील तुषार लहू पाटील या युवा शेतकऱ्याने सात बिघे क्षेत्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड केली. ते मुलाफुलाप्रमाणे जपत होते. कमी पाणी असल्याने ठिबकवर पीक फुलविले. (cotton crop roots affected by fungus due to this whole crop had to harvest crop dhule news)

तब्बल दीड महिन्याचे कपाशीचे पीक त्यांना उपटावे लागले. मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव, तर पाने लाल पडू लागली होती. हा प्रादुर्भाव अधिक पसरल्याने त्यांना हे पीक काढावे लागले. पाटील यांना उत्पादन तर नाहीच, पण लाखावर आर्थिक फटका बसला आहे. कापूस उपटताना आसवे अनावर झाली होती.

जूनमध्ये कपाशीची लागवड

युवा शेतकरी तुषार पाटील यांची कमी क्षेत्रात अन् कमी पाण्यात अधिक उत्पादन काढण्यात ख्याती आहे. कापसाचे विक्रमी उत्पादन ते घेतात. या वर्षी शासनाने मेमध्ये कपाशीची लागवड करू नये, असे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बुरशीचा प्रादुर्भाव अन् पाने पडली लाल

ठिबक सिंचनाने कपाशीला वेळेवर आणि पुरेसे पाणी दिले जात होते. पिकाची वाढ चांगली होत होती. महिना झाल्यानंतर पाने लाल पडू लागली. पीक उपटून बघितले तर मुळांना आणि खोडाला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले होते.

कपाशीची अधिकच नाजूक अवस्था होत चालली होती. पाटील यांनी सात बिघ्यांतील कपाशीचे पीक उपटले. त्यांना या वर्षी पाच लाखांवर उत्पादन अपेक्षित होते. मात्र बुरशीमुळे बियाणे, लावणी, मशागत, मजुरीमुळे लाखाचा फटका बसला.

मक्याची पेरणी

श्री. पाटील यांनी या क्षेत्रात पावसाळी मक्याची पेरणी करण्यास सुरवात केली आहे. पुरेसे अन्नद्रव्य घटक मिळाले नसल्याने कपाशीचे नुकसान झाले असावे, असा अंदाज चर्चिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT