A senior police officer inspects an illegal scrap business on the Mumbai-Agra highway. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News :स्क्रॅपचा अवैध व्यवसाय; मुंबई-आग्रा महामार्गावरील 20 दुकानमालकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील पोलिस प्रशासनाने मुंबई-आग्रा महामार्गावरील पोलिस चौकी परिसरात शुक्रवारी (ता. २४) रात्री टाकलेल्या छाप्यातून स्क्रॅपचा अवैध व्यवसाय उद्‌ध्वस्त करण्यात आला.

या प्रकरणी २० दुकानमालकांवर मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, छाप्यात तब्बल ७७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. (Crime against 20 scrap shop owners on Mumbai Agra highway dhule crime news)

शहरातील मुंबई ते आग्रा महामार्गालगत असलेल्या २० ते २२ पत्रटी दुकानांमध्ये व दुकानासमोर तसेच दुकानांच्या मागील बाजूस लहान-मोठे चारचाकी वाहन, तसेच अवजड वाहने आणली जात होती.

या वाहनांचे गॅस कटरच्या सहाय्याने तुकडे करून इंजीन, चेसीस, रेडिएटर, केबिन, बॉडी अशा विविध भागांत विभागणी करून अवैध विक्री केली जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक काळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील व पथकाला घटनास्थळी बोलविले.

विविध प्रश्‍नांची सरबत्ती

पत्रटी दुकानांचे मालक व कामगारांना त्यांच्या दुकानात व दुकानासमोर असलेल्या विविध वाहनांच्या वेगवेगळ्या केलेल्या स्पेअरपार्टबाबत विचारणा केली. विविध वाहनांचे स्पेअरपार्ट कोणाकडून व कोठून आणले आहेत, घटनास्थळी असलेला माल हा स्क्रॅपचा आहे किंवा कसे, प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेतली आहे का, दुकानमालकांकडे शासन मान्य स्क्रॅपचा परवाना आहे किंवा कसे याबाबत विचारपूस केली.

मात्र, दुकानमालक समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे परवानगीचे कागदपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे अपर पोलिस अधीक्षक काळे यांनी योग्य ती कारवाई सुरू केली.

कसुरीमुळे कारवाई

प्रत्येक दुकानात तसेच दुकानासमोर, दुकानाच्या मागील बाजूस पटांगणात चारचाकी व अवजड वाहनांचे विविध प्रकारचे स्पेअरपार्ट, वाहनांसह एकूण ७७ लाख २५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक संदीप काळे, हवालदार किसन चौधरी, प्रभाकर सोनवणे, किरण कोठावदे, संदीप कदम, सुमीत चव्हाण, पोलिस नाईक प्रेमराज पाटील, भूषण सपकाळे, वाहनचालक नागेश पिंगळे यांनी केली.

या दुकानदारांवर गुन्हा

या प्रकरणी हवालदार प्रभाकर सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार २० दुकानमालकांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यात वारीस अली अहमद खान, सगीर खान शब्बीर खान, अझहरअली रोनक अली, अख्तरअली अकबर अली, मजहर अली रोनक अली, असगर अली रोनक अली, सिराज अली जाफर अली, अझहरअली रोनक अली सर्व (रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे), असगरअली अकबरअली (रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड), मोहमंद रफीक मोहंमद हाशिफ (रा. धुळे), गुलाम नबी दस्तगीर शेख (रा. कबीरगंज, वडजाई रोड, धुळे), अख्तर अली गुलाम हुसैन (रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे), मोहंमद हुसैन लियाकत अली, अहमद हुसैन, तुफेल अहमद शेख (रा. जामचा मळा, नाल्याकिनारी, धुळे), एहसान (पूर्ण नाव माहीत नाही, रा. धुळे), कौसर अली (पूर्ण नाव माहीत नाही, रा. धुळे), सगीर शेख (रा. जामचा मळा), आझाद भाई (रा. सुलतानियाँ मदरसामागे, धुळे), जाफरअली (रा. मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड) याचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT