Taloda: Deputy Chairman of Agricultural Produce Market Committee Hitendra Kshatriya, NCP City President Yogesh Marathe, Sandeep Pardeshi etc. while inspecting the damage. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धीर

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुक्यातील हजारो नागरिकांसह असंख्य शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तळोदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ६) प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

तसेच नुकसानीचे लवकर पंचनामे व्हावेत याबाबतदेखील तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन दिले. (dam and inspect damage Patience to farmers from Taloda NCP officials Nandurbar News)

तळोदा तालुक्यात दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यातील हजारो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे.

तसेच असंख्य शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या वादळामुळे शेतातील केळीचे नुकसान झाले असून, वीजपुरवठा करणारी डीपी व विजेचे खांबसुद्धा जमीनदोस्त झाले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी तळोदा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जात पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, संचालक निखिल तुरखिया, संचालक प्रल्हाद फोके, संचालक पिंटू गाढे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी आदी उपस्थित होते.

त्यांनी शेतकरी पीतांबर मंगा पाटील, दीपक मनोहर पाटील, संतोष भीमराव पाटील, कनिलाल रतिलाल पटेल, विनोद मनोहर पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीबद्दल माहिती घेतली.

तसेच शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित होऊन लवकरात लवकर शासनामार्फत मदत मिळवून द्यावी, असे आशयाचे निवेदन तहसीलदार गिरीश वखारे यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT