Dhule News
Dhule News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जुन्या वसमार शिवारात बिबट्याचे दिवसा दर्शन

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : येथील जुन्या वसमार शिवारात तीन दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर त्रस्त झाले आहेत. रात्री दिसणारा बिबट्या चक्क दिवसा दर्शन देत असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

जुन्या वसमार शिवारात रात्रीच्या वेळी बिनधास्त फिरणारा बिबट्या दिवसाही दर्शन देत असल्याची चर्चा आहे. शिवारातील शेतकरी समाधान प्रकाश देवरे, शेखर अशोक देवरे यांनी वन विभागास माहिती दिल्यावर वनपाल डी. पी. पगारे, वनरक्षक पी. जे. जेलेवाड, वन कर्मचारी भटू बेडसे, नितीन भदाणे आदींनी भेट देत रात्रीची गस्त घातली. (Daytime sighting of leopard in old Vasmar Shivara Dhule News)

तथापि, एक वा दोन दिवस रात्रभर गस्त घालून बिबट्याचा वावर कमी होणार नाही. कारण म्हसदीसह परिसरात मोठे वनक्षेत्र असल्याने वन्यपशूंचा मुक्त संचार आहे. काकोर, बोरमळा, पाडगण, चिंचखेडे व बेहेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी ठार झाले आहेत.

वन विभागाने कायदेशीर पंचनामे केले असले तरी वेळेवर सर्वांना नुकसानभरपाई मिळण्याची सुतराम शक्यता नसते. दुसरीकडे दिवसा दर्शन देणाऱ्या बिबट्यामुळे शेतात थांबावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले

वनक्षेत्रात बिनधास्त असणारे बिबटे आता सावज (भक्ष्य) शोधण्यासाठी शेतशिवारात दाखल होत आहेत. जुन्या वसमार शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. समाधान देवरे यांना सोमवारी (ता. ६) पहाटे बिबट्याची जोडी आणि दोन बछड्यांनी दर्शन दिले.

अशाच प्रकारच्या घटना इतरत्रही हमखास पाहायला मिळतात. यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सर्वच ठिकाणी बागायती शेती वाढली आहे. भारनियमनामुळे रात्री उशिरापर्यंत शेतात पाणी देऊन शेतकरी दिवसा उशिरा शेतात येतात, तर काही शेतकऱ्यांची घरेच शेतात असल्याने दिवसाच काय आणि रात्री काय बिबट्या हमखास पाहायला मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

वनमजुरांना रात्रीची पिंपळनेर कार्यालयात सक्ती

दरम्यान, म्हसदीसह परिसरात बिबट्या दिसणे नवीन नाही. अगदी कुत्रा-मांजर दिसावा असा बिबट्या आणि बिबट्याची जोडी अनेक शेतकऱ्यांनी पाहिली आहे.

चौफेर बिबट्या असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. स्थानिक ठिकाणी रात्रीच्या गस्तीसाठी वनपाल, वनरक्षकांसह‌ स्थानिक वनमजुरांची(वॉचमन) आवश्यकता असताना म्हसदी मंडळाच्या कायम वनमजुरांना पिंपळनेर कार्यालयात रात्री थांबण्याची सक्ती केली जात असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली.

पिंपळनेर येथे अनेक कर्मचारी असताना म्हसदी मंडळातील कर्मचाऱ्यांना पन्नास ते साठ किलोमीटर अंतर प्रवास करत रात्रीची आवश्यक नसताना सक्तीची ड्यूटी करावी लागत असल्याची चर्चा आहे.

शेतशिवारात बिबट्याची जोडी आणि बछड्यांचा मुक्त संचार आहे. शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत आवश्यक नसताना रात्री-अपरात्री एकटे फिरू नये. दोनपेक्षा अधिक जण असताना रात्रीच्या वेळी शेतात काम करावे.

-डी. पी. पगारे, वनपाल, म्हसदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT