While inaugurating the Dhule-Mumbai railway facility at the station, Dr. Subhash Bhamre. Neighbors Pratibha Chaudhary, Gajendra Ampalkar and colleagues. 
उत्तर महाराष्ट्र

Dhule CST Railway: धुळे-सीएसटी रेल्वेस सुरुवात; धुळे-पुणे सुविधेसाठीही पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News: धुळेकरांना रेल्वेने पुणे येथे जाण्यासाठी अमरावती-पुणे रेल्वेच्या वेळेनुसार धुळे-चाळीसगाव रेल्वेच्या नियमित वेळेत बदल करून चाळीसगावपर्यंत प्रवाशांना जाता येईल. तसेच पुढे अमरावती-पुणे रेल्वेने चाळीसगाव येथून पुण्याचा प्रवास करता येईल, या दृष्टीने धुळे ते पुणे रेल्वेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

शहरातील रेल्वेस्थानकावर सोमवारी (ता. १३) सकाळी साडेसहाला खासदार डॉ. भामरे यांनी धुळे-सीएसटी (मुंबई) रेल्वेचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. त्या वेळी ते बोलत होते. (Dhule CST railway started dhule news)

महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, स्टेशन प्रबंधक संतोष जाधव, नगरसेवक हर्षकुमार रेलन, राजेश पवार, शशी मोगलाईकर, काँग्रेसचे ज्येष्ठ मुकुंद कोळवले आदी उपस्थित होते.

धुळे-मुंबई रेल्वे नियमित धावणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. आता धुळे-मुंबई-धुळे रेल्वेसेवा नियमित झाली आहे. याकामी खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला.

धुळे-मुंबई रेल्वेला एकूण १६ बोगी आहेत. पैकी १६ बोगींमध्ये एक स्लीपर कोचचा समावेश आहे. तसेच नॉन एसीच्या पाच, तर आठ जनरल बोगी आहेत. स्लीपर कोचचे प्रवासी भाडे ५३५ रुपये, नॉन एसीसाठीचे भाडे दीडशे, तर जनरल बोगीचे भाडे १३५ रुपये आहे. ११०१२ धुळे-सीएसटी ही रेल्वे रोज सकाळी साडेसहाला धुळ्याहून निघून दुपारी सव्वादोनला सीएसटीला पोचेल.

तसेच ११०११ सीएसटी- धुळे ही रेल्वे रोज दुपारी बाराला सीएसटी येथून निघून रात्री ८.५५ ला धुळ्याला पोचेल. या रेल्वेला शिरूड, जामदा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर स्थानकांवर थांबा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT