banana orchard esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : पाण्याअभावी फळबाग फुलली नाही; खानदेशात समृद्धी दर्शविणाऱ्या निकुंभेतील उलाढाल शून्यावर

Dhule Water Scarcity : बोर, पपई, टरबूज आदींसह विविध फळबागांसाठी खानदेशात अग्रेसर, राज्यातच नव्हे तर परराज्यात फळे विक्रीस नेणारे निकुंभे (ता. धुळे) येथे यंदा प्रथमच एकाही शेतात फळबाग नाही.

एल. बी. चौधरी - सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : बोर, पपई, टरबूज आदींसह विविध फळबागांसाठी खानदेशात अग्रेसर, राज्यातच नव्हे तर परराज्यात फळे विक्रीस नेणारे निकुंभे (ता. धुळे) येथे यंदा प्रथमच एकाही शेतात फळबाग नाही. तलाव, बंधाऱ्यांसह विहिरी व कूपनलिका आटल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे शेतीतील उलाढाल शून्यावर आली आहे. गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. (Dhule For first time none of farms have orchards This situation has arisen due to drying up of lakes dams and wells)

एकता व सहकार्याची जोड यातून स्वतःबरोबरच गावाचाही विकास साधणारे निकुंभेने अवघ्या खानदेशला शेतीतून समृद्धी मिळविण्याचा मार्ग दाखविला. संपूर्ण शेतकरी कुटुंबे असलेल्या या गावाने श्रमदानातून दोनशेहून अधिक बंधारे बांधून पाणी अडविले. दुष्काळ असो वा नसो, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात फळबाग दिसायची. अनेक ट्रकभरून परराज्यात फळे पाठविली जात असे.

एकताही कौतुकास्पद

निकुंभे चार हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाने सामाजिक ऐक्य टिकवून ठेवल्याने ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजे सुमारे ७० वर्षांपासून ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तंटामुक्तीचे बक्षीस गावाने मिळविले आहे.

श्रमदानातून बंधारे

गावाजवळ धरण वा तलाव नाही; परंतु त्याची कसर ग्रामस्थांनी बंधारे बांधून भरून काढली. गावाजवळ काही टेकड्या आहेत. पावसाळ्यात टेकड्यातून वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी श्रमदान करून बंधारे बांधले. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत पाटबंधारे विभागानेही त्यात काहीशी भर घातल्याने दोनशेहून अधिक बंधारे बांधून पाणी जिरविले आहे. शेकडो शेततळेदेखील बांधले आहेत. त्यामुळे दुष्काळात विहिरीत पाण्याची उपलब्धता असे. यंदा प्रथमच निसर्गाची वक्रदृष्टी गावावर पडली आहे. (latest marathi news)

फळबागातून समृद्धी

गावात ९० टक्के शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घेतला असून, पपई, बोर, डाळिंब, केळी, ऊस, सीताफळ आदींचे उत्पादन घेतले जाते. बिनाबियांची तैवान पपई जिल्ह्यात तीस वर्षांपूर्वी येथेच प्रथम गुलाबसिंग गिरासे यांनी लागवड केली होती. गेल्या वर्षांपर्यंत येथून रोज पपईच्या किमान दोन ट्रक गुजरातेत विक्रीस जात होत्या.

डाळिंब घेण्यासाठी दूरचे व्यापारी येत. सीजनमध्ये बोरांच्या रोज दोन-तीन गाड्या भरून बोर विक्रीस नेल्या जात. दारिद्ररेषेखाली असणारे गाव फळबागामुळे समृद्ध झाले. लोकवर्गणीतून मंदिर व डिजिटल शाळा झाली. गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने एकाही शेतकऱ्याने फळबाग लावली नाही.

त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पाणीटंचाईप्रश्‍नी उपाययोजना म्हणून दोन कूपनलिका बसविण्यात आल्या. त्यातून सार्वजनिक विहिरीत पाणी टाकण्यात आले. त्यामुळे टंचाई काहीशी कमी झाली असली तरी सध्या आठ दिवसांआड पाणी मिळते, असे सरपंच प्रतिनिधी दादाभाई पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT