students esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम कागदावरच! सूचना नसल्यामुळे शाळा द्विधा मनःस्थितीत; काहींचा कृतिशील पुढाकार

Dhule News : शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे हा उपक्रम कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : संस्कारशील विद्यार्थी घडावेत, त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा विकास व्हावा, सहकार्याची भावना वाढीस लागावी म्हणून शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक आठवड्याला ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्यामुळे हा उपक्रम कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. (Dhule Happy Saturday initiative on paper Schools in confusion)

सध्याच्या काळात विद्यार्थी दशेमध्येच मुलांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून शासनाने आनंददायी शिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय मार्चमध्ये घेतला.

कृती, खेळ, कौशल्य यांवर आधारित प्राणायाम, योग, ध्यानधारणा, श्वसनाचे आरोग्याच्या उपाययोजना, तंत्र, स्वतःच्या रक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापनातील मूलतत्त्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षणे आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक-भावनिक, संभाषण कौशल्ये विकसित करणे, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांना ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम बनवणे आदी गोष्टी नजरेसमोर ठेवून हा उपक्रम जाहीर करण्यात आला.

मात्र, अनेक शाळांमध्ये अद्याप प्रत्येक शनिवारी कोणता वेगळा उपक्रम राबवायचा, मुलांच्या विविध गुणांना वाव कसा द्यायचा, यासंदर्भातील उपक्रमांची आखणी करण्यात आलेली नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला असला, तरीही अद्याप त्याबाबत शाळांना सूचना दिलेल्या नाहीत. (latest marathi news)

त्यामुळे उपक्रम घ्यायचा की नाही, या द्विधा मनःस्थितीत शाळा आहेत. हा उपक्रम कधी राबवला जाणार, याविषयी विद्यार्थी व पालकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे. याउलट धुळे शहरातील काही शाळांनी पुढाकार घेत संगीतमय योगा, परसबाग फुलविणे, क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.

एकत्रितपणे तयार करणार रूपरेषा

‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे एकत्रितपणे रूपरेषा तयार करणार असल्याचे समजते. मात्र, निर्णय जाहीर होऊन तीन महिने झाले तरीही अद्याप या उपक्रमाबाबत शाळांना कोणत्याही अधिकृतपणे सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे शिक्षण क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT