Tribal Development Minister Dr. Vijayakumar Village. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बारमाही रस्ते, घरकुलांसह स्वयंरोजगारातून वाडे-पाडे समृद्ध करणार : डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी वाडे-पाडे येत्या सहा महिन्यांत न भूतो न भविष्यति समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

प्रतीक जोशी

Nandurbar News : आदिवासी दुर्गम भागाला जोडणारे बारमाही रस्ते, प्रत्येकाला घरकुल आणि बचतगटांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे जाळे विणून आदिवासी वाडे-पाडे येत्या सहा महिन्यांत न भूतो न भविष्यति समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

बिजरीगव्हाण (ता. अक्कलकुवा) येथे बुधवारी (ता. ७) विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. (Dr Vijayakumar gavit statement Perennial roads houses will enrich villages through self employment nandurbar news)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सरपंच वीरसिंग पाडवी (भगदरी), दिलीप वसावे (सरी), रोशन वसावे (बिजरीगव्हाण), धनसिंग वसावे (डाब), ज्योती वळवी (मोलगी), दिनकर वळवी, दिनेश खरात, बबलू चौधरी व पंचक्रोशीतील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, की गेल्या दहा वर्षांत मिळाला नाही त्याच्या दहापट निधी येत्या सहा महिन्यांत विकासकामांसाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात कुठल्याही गावाचा, पाड्याचा संपर्क तुटणार नाही असे बारमाही रस्ते जिल्हाभर आपणास पाहावयास मिळणार आहेत.

पात्र असलेल्या परंतु ‘ब’ यादीत नाव नसलेल्या प्रत्येक नागरिकाला घर दिले जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक बचतगटाला रुपये दहा हजारांचे अनुदान स्वयंरोजगार निर्मितीसाठी दिली जाणार आहे.

सुमारे एक हजार महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून गावातच रोजगारमिर्मितीला चालना दिली जाणार आहे. जो गायी पाळू इच्छितो त्याला गायी व वनपट्टेधारकांना शेळ्यांचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.

गावागावांत अध्यात्म आणि लोकप्रबोधनाचे काम करणाऱ्या भजनी मंडळांना भजनाचे साहित्य, तरुण मुलांसाठी क्रिकेटचे साहित्या येत्या आठ दिवसांत वितरित केले जाणार आहे. ते म्हणाले, की जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गाव.

घर आणि व्यक्तीपर्यंत शुद्ध जल पोचविण्यासाठी खासदार डॉ. हीना गावित यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न आहेत. वाड्यापाड्यातील समृद्धीसाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT