The winning group and dignitaries of 'Ek Sham Shaheedoke Naam' inter-school patriotic song singing competition organized by Astitta Group and Senior College Navapur. esakal
उत्तर महाराष्ट्र

नवापूरात ‘एक शाम शहिदों के नाम’

सकाळ वृत्तसेवा

नवापूर (जि. नंदुरबार) : येथील अस्तित्व ग्रुप आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक शाम शहीदो के नाम’ हा आंतरशालेय देशभक्तिपर गीत गायनाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रताप केशव पाटील चर्चासत्र भवनात उत्साहात झाला.

प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, नगराध्यक्षा हेमलता पाटील, मीराबेन चोखावाला, सार्वजनिक गुजराती शाळेच्या उपप्राचार्य कमलबेन शहा उपस्थित होते. (Ek Sham Shahidon Ke Naam in Nawapur nandurbar Latest Marathi news)

प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल, नगराध्यक्ष हेमलता पाटील, मृदुला भांडारकर, मीराबेन चोखावाला यांनी मनोगत व्यक्त केले. निशा जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय डॉ. सुषमा पाटील यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पाटील, रागिणी चव्हाण यांनी केले. उज्ज्वला कोठावदे यांनी आभार मानले.

देशभक्तिपर गीताच्या कार्यक्रमाच्या सुरवातीस जरीन सलीम पठाणने ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नवापूर येथून एकूण बारा शाळांमधून १८५ विद्यार्थ्यांनी कला सादर केली. स्पर्धेचे परीक्षण अश्विन पाटील, हेमंत पाटील, कांचन नगरकर यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र

स्पर्धेत पहिल्या गटातून श्रीमती प्र. अ. सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस नॅशनल उर्दू हायस्कूल यांनी तर श्री शिवाजी हायस्कूल तृतीय क्रमांक पटकावला.

दुसऱ्या गटातून प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी स. म. चोखावाला लिटिल एजल्स ॲकॅडमी हे ठरले तर द्वितीय क्रमांक फिलाडेल्फिया मिशन स्कूल करंजी यांनी पटकावला, तसेच सार्वजनिक उर्दू हायस्कूल यांना तृतीय क्रमांक मिळाला. यशस्वी विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी जयस्वाल, हेमलता पाटील, मंगेश वाणी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘त्या’ बाळांची आज ‘डीएनए’ टेस्ट; नर्सकडून बाळाची अदलाबदल झाल्याचे प्रकरण..

Panchang 30 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

UP Logistics Hub: यूपीत ८००० कोटींचा लॉजिस्टिक्स हब, भारताच्या 'सप्लाय चेन'ला मिळणार नवी गती!

Kolhapur Police : तरुणीवर हल्ला प्रकरण, हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याची ‘मस्ती जिरवली’; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

"आजोबांसारखाच नातू !" बिग बींच्या नातवाच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक अवाक ! भरभरून होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT