swachha bharat abhiyan esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात कुटुंबभेट अभियान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण टप्‍पा-२ अंतर्गत केंद्र व राज्‍य शासनातर्फे देशभर शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी गावे हागणदारीमुक्‍त अधिक मॉडेल केली जात आहेत.

जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दृश्यमान स्वच्छतेसाठी कुटुंबभेटी अभियान राबविण्यात येत आहे. (Family visit campaign in district under Swachh Bharat Mission dhule news)

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत हागणदारीमुक्त अधिक जिल्ह्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्ह्यातील हागणदारी मुक्त अधिक (मॉडेल) झालेल्या गावांमधून हे अभियान राबविण्‍यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशावर्कर, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, सीआरसी यांच्यामार्फत भेटी देण्यात येत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गृहभेटीदरम्यान कुटुंबांना विचारण्याची प्रश्नावली तयार करण्‍यात आली आहे. यामध्‍ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापन, प्लॅस्टिक व्‍यवस्‍थापन, मैला गाळ व्‍यवस्‍थापन, पाणी स्‍वच्‍छता समिती आदी विषयांबाबत ५० प्रश्‍न विचारले आहेत.

याची पडताळणी कुटुंबभेटी अभियानातून करावयाची आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT