armer suicide due to debt  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्जफेडीच्या चिंतेने घेतले कीटकनाशक

प्रतीक जोशी

नंदुरबार : नापिकी व त्यात बँकांचा कर्जवसुलीसाठी सुरू असलेला तगादा, ते कर्ज फेडण्यासाठी गावातील काहींकडून घेतलेली तातडीची रक्कम देण्यासाठीची चिंता आदींमुळे सैरभैर झालेल्या नगाव (भालेर) येथील शेतकरी संजय साहेबराव पाटील (वय ५०) यांनी कीटकनाशक घेत आत्महत्या केली. अत्यवस्थ अवस्थेत त्यांच्या मुलाने रुग्णालयात दाखल केले. मात्र ते वाचू शकले नाहीत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (farmer suicide due to debt nandurbar news)

कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे काही दिवसांपासून संजय पाटील तणावाखाली होते. त्यांची अक्राळे शिवारात शेती आहे. पत्नी, एक मुलगा व सून असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि मजुरी करून ते कुटुंबाचा गाडा चालवीत होते. सद्या त्यांनी काही क्षेत्रात मका लावला आहे. मात्र खरीप हंगामात झालेल्या अत्यल्प पावसात त्यांना उत्पन्न आले नाही.

त्यातच बँकेकडून पीककर्ज म्हणून ८० हजार रुपये घेतले होते. ठिबक सिंचनासाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र खरिपाचा खर्च वजा जाता हाती काहीच उरले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत संजय पाटील हे काही दिवसांपासून तणावात होते. मार्चअखेरमुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तगादा सुरू होता.

त्यामुळे त्यांनी गावातील काही लोकांकडून उसनवार घेऊन ८० हजार पीककर्ज नुकतेच बँकेत भरल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. यंदा उत्पन्न आले नाही, नापिकीमुळे बँकेचे उर्वरित कर्ज कसे फेडणार, पीककर्ज फेडण्यासाठी गावातील लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करावेत? या ताणामुळे ते काही दिवसांपासून जेवणही घेत नव्हते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

शुक्रवारी (ता. ३१) रात्री संजय पाटील हे अक्राळे शिवारातील शेतात मक्याला पाणी देण्यासाठी गेले होते. पहाटे चारला ते घरी आले व ओट्यावर असलेल्या खाटेवर झोपले.

पहाटे साडेचारच्या सुमारास वडील आले की नाही, हे पाहण्यासाठी मुलगा भाऊसाहेब उठला असता खाटेवर झोपलेले वडील संजय पाटील यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यांना विचारणा केली असता नापिकीमुळे उत्पन्न आले नाही, बँकेचे कर्ज व इतर कर्ज फेडणार कसे? यामुळे मी पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध प्राशन केल्याचे संजय पाटील यांनी मुलगा भाऊसाहेब व पत्नी मंगलबाई यांना सांगितले.

त्यांनी तातडीने नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. भाऊसाहेबने संजय पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टर संजय पटले यांनी ८.२५ च्या सुमारास उपचारादरम्यान संजय पाटील यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले.

भाऊसाहेब पाटील यांच्या माहितीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, याबाबत नंदुरबारच्या तहसीलदारांनाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, संजय पाटील यांच्यावर दुपारी दोनला नगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT