Funds News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दलित वस्ती सुधारणेसाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (जि. धुळे) : साक्री तालुक्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) सामाजिक विकास योजनेंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. (Fund of Rs 4 crore approved in Sakri taluka for improvement of Dalit slums Dhule News)

मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्री विधानसभा मतदारसंघासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत दलित वस्तीत सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्यात ११ गावांना एलईडी हायमास्ट, दहा गावांना रस्ता काँक्रिटीकरण, सात गावांत पेव्हरब्लॉक बसविणे, तर छाईल (ता. साक्री) येथे दलित वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे अशी कामे मंजूर करण्यात आलेली आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दलित वस्ती असलेले मौजे म्हसदी, बेहेड, दारखेल, उंभरे, देगावे, उंभर्टी, नाडसे, खुडाणे, धाडणे, भोनगाव, पेरेजपूर, चिकसे, दिघावे, छाईल, धमणार, चिंचखेडा, जैताणे, निजामपूर, भाडणे आणि मालपूर अशा २० गावांमध्ये प्रत्येकी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली.

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर करून दिल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) डॉ. तुळशीराम गावित, आमदार मंजुळा गावित यांनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

तू भाई अपना काम कर...! Steve Smith सोबत 'राड्या'चा किस्सा रोहित शर्माने मजेशीर अंदाजात सांगितला; ०.४९ सेकंदाचा भन्नाट Video

Credit Card : ₹3,000 पर्यंत कॅशबॅक; झिरो जॉइनिंग फी; UPI पेमेंट्सवरही फायदा! जाणून घ्या या नव्या क्रेडिट कार्डच्या खास ऑफर्स

Shani Dosha: शनि दोष कमी होईल; फक्त हनुमान मंदिरात गेल्यावर ही गोष्ट लक्षात ठेवा!

SCROLL FOR NEXT