MLA Amarishbhai Patel and MLA Kashiram Pawra
MLA Amarishbhai Patel and MLA Kashiram Pawra esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विकासासाठी 1000 कोटींचा निधी मंजूर; अमरिशभाई, पावरामुळे सर्वोच्च मंजुरीची नोंद

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : शिरपूर तालुक्यातील रस्ते व इतर कामांसाठी तब्बल हजार कोटींपेक्षा अधिक निधी (Fund) मंजूर झाला आहे. विकासाबाबत तालुक्यातील निधी मंजुरीची ही सर्वोच्च नोंद आहे.

याकामी माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांनी केलेल्या भक्कम पाठपुराव्याचे हे यश आहे. (funds More than thousand crore have been approved for roads other works in Shirpur dhule news)

शिरपूर तालुका विकासासाठी आमदार पटेल आणि आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे ९ मार्चला सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शहरासह तालुक्यासह १८७ कोटी सहा लाख ३५ हजारांच्या निधीची तरतूद झाली. याबाबत आमदारद्वयींनी दिलेली माहिती दिली.

हॅमअंतर्गत ५५० कोटींचा निधी

हायब्रिड अ‍ॅन्युटी मॉडेल (हॅम)अंतर्गत मालकातर-कोडीद-बोराडी-नांदर्डे-वाडी-वाघाडी-जातोडे-बाळदे-गिधाडे अशा ४७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे ५५० कोटींचा निधी मिळाला. यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित आणि शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागासाठीच्या निधीचा समावेश आहे.

आशियाई बँकेतून ३०० कोटी

आढे-थाळनेर-मांजरोद-होळनांथे-मांजरोद-बभळाज अशा ४२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. हा निधी आशियाई बँक अर्थसहाय्यातून हाती येणार आहे.

अंतुर्लीजवळ पूल, निवासस्थाने

आमदार पटेल, उद्योजक चिंतनभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे अंतुर्ली (ता. शिरपूर) शिवारात लेंडी नाल्यावरील पुलासाठी चार कोटींचा निधी मिळाला. शिरपूर शहरातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ९४ लाख मिळाले. पळासनेर येथे राज्य शुल्क निरीक्षक कार्यालय बांधकामासाठी चार कोटी पाच लाख ४७ हजारांचा निधी मिळाला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

राज्य रस्त्यांसाठी १२ कोटी

सहा राज्यस्तर रस्तेकामांसाठी १२ कोटी ५० लाखांमध्ये खंबाळे ते आंबे रस्ता सुधारणेसाठी दीड कोटी, महादेव ते भोईटी रस्ता सुधारणेसाठी साडेतीन कोटी, सुळेजवळ पळासनेर-हाडाखेड रस्त्यावर काँक्रिट दुभाजकासाठी ५० लाख, थाळनेर ते भाटपुरादरम्यान तापी नदीपात्राच्या संरक्षक भिंतीसाठी चार कोटी ५० लाख, पळासनेरजवळ पळासनेर-हाडाखेड रस्त्यावर काँक्रिट दुभाजकासाठी ५० लाख, खामखेडा ते वरला जलनिस्सारणासह रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मिळाले.

बिगरआदिवासी क्षेत्रात ८३ कोटी

तालुक्याच्या बिगरआदिवासी भागातील ३७ कामांसाठी ८३ कोटी २० लाख रुपये मिळाले. यात जुनापाणी ते निमझरी रस्ता सुधारणेस साडेचार कोटी रुपये, उमर्दा ते चारणपाडा गावापर्यंत रस्ता सुधारणेस पावणेतीन कोटी, पनाखेडमध्ये काँक्रिट रस्त्यासाठी ७५ लाख, फत्तेपूर फाटा ते फत्तेपूर गाव रस्ता सुधारणेस अडीच कोटी,

दाबक्यापाडा रस्ता सुधारणेस अडीच कोटी रुपये, वाठोडा ते जैतपूर रस्ता सुधारणेस दोन कोटी, लाकड्या हनुमान गावात रस्ता काँक्रिटीकरणास एक कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते आमोदे डायव्हर्जन रस्ता काँक्रिटीकरणास तीन कोटी, सावळदे ते उंटावद रस्ता काँक्रिटीकरणास दहा कोटी, वाघाडी फाटा ते जातोडे रस्ता सुधारणेस साडेतीन कोटी,

सुळेजवळ रस्ता काँक्रिटीकरणास दोन कोटी, उंटावद-खर्देदरम्यान अरुणावती नदीला संरक्षक भिंत बांधण्यास ६० लाख, वाघाडीजवळ संरक्षक भिंत व काँक्रिट गटारीसाठी एक कोटी ३० लाख, आढे-थाळनेर-मांजरोद रोडवर काँक्रिट गटारासाठी ८० लाख, करवंदजवळ काँक्रिट रस्त्यास अडीच कोटी, खंबाळे ते रोहिणी रस्ता सुधारणेस साडेतीन कोटी, कुरखळी ते सावळदे रस्ता सुधारणेस दीड कोटी मंजूर झाले.

तऱ्हाडी-ममाणे-जुनी अंतुर्ली रस्ता सुधारणेस दोन कोटी ४० लाख, सांगवी-होऱ्यापाणी-वरझडी रस्ता सुधारणेस तीन कोटी, होळनांथेत आर. सी. पटेल शाळेजवळ काँक्रिट गटार व संरक्षक भिंतीस साडेतीन कोटी, होळनांथे ते मांजरोद व मांजरोद ते तापी नदी रस्ता सुधारणेस एक कोटी, मांजरोद ते घोडसगाव फाटा-होळनांथे गावास ५० लाख,

अभाणपूर ते तऱ्हाडी रस्ता सुधारणेस दोन कोटी ४० लाख, जुने भामपूर रस्ता व गटार काँक्रिटीकरणास दोन कोटी, थाळनेर ते रा. मा. चार रस्ता सुधारणेस अडीच कोटी, जुने मांजरोद ते जापोरा रोड सुधारणा व पूल बांधण्यास चार कोटी, कळमसरे ते रा. म. ५२ रस्ता सुधारणेस दोन कोटी, खर्दे बुद्रुक, बाभुळदे रस्ता सुधारणेस दीड कोटी, थाळनेर-असली रस्त्यास एक कोटी,

तऱ्हाडी ते तऱ्हाड-कसबे रस्त्यास दोन कोटी, चांदपुरी-जातोडा रस्ता सुधारणेस दोन कोटी, भटाणे ते अभाणपूर रस्ता सुधारणेस दोन कोटी, पिळोदा-घोडसगाव रस्त्यास एक कोटी ६० लाख, उप्परपिंड रस्ता सुधारणेस ९० लाख, वाघाडी-वाडी रस्ता सुधारणेस अडीच कोटी, ताजपुरी रस्ता सुधारणेस ७० लाख, रुदावली ते टेंभे रस्त्यास एक कोटीचा निधी मिळाला.

आदिवासी भागासाठी ८१ कोटी

आदिवासी भागातील ३३ कामांसाठी ८१ कोटी ७० लाख मिळाले. यात रा. म. तीन ते खैरखुटी रस्ता सुधारणेस दोन कोटी ९० लाख, सटीपाणी ते आंबा फाटा पूल व ड्रेनेज बांधकामास साडेतीन कोटी, रा. मा. चार ते सावेर रस्ता सुधारणेस दीड कोटी, शेमल्या ते चारण पाडा रस्ता सुधारणेस दोन कोटी ६० लाख,

सटीपाणी ते व्हीआर ८२ रस्ता सुधारणेस एक कोटी, गुऱ्हाळपाणी ते धाबादेवी रस्ता सुधारणेस चार कोटी, पिंप्राडपाडा रस्ता जलनिस्सारण काम व सुधारणेस अडीच कोटी, धाबादेवी ते एमडीआर पाच रस्ता सुधारणेस चार कोटी, रा. मा. चार ते चांदपुरी रस्ता सुधारणेस एक कोटी ७५ लाख, लाकड्या हनुमान-नवापाडा-आसरापाणीदरम्यान जलनिस्सारणासह रस्त्यास दोन कोटी,

जामन्यापाडा ते बाखर्लीदरम्यान जलनिस्सारणासह रस्त्यास दोन कोटी ७५ लाख, बोराडी ते तिखीबर्डी काँक्रिटीकरण व रस्ता सुधारणेस अडीच कोटी, निमझरीजवळ रस्त्यास एक कोटी, निमझरीजवळ संरक्षक भिंतीस दीड कोटी, निमझरीजवळ पूल बांधण्यास दीड कोटी, नांदर्डे-वासर्डी रस्ता, छोटा पूल व स्लॅब ड्रेनसाठी दीड कोटी,

बोराडी ते विद्यानगर रस्ता व जलनिस्सारणास अडीच कोटी, बोराडी-चिंचपाणी रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दोन कोटी, नांदर्डे ते सामऱ्यापाणी रस्ता व जलनिस्सारणास अडीच कोटी, दुर्बळ्या ते गव्हाणपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दोन कोटी, फत्तेपूर ते रतन लालसिंगपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दीड कोटी,

साकऱ्यापाडा ते इंगनपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दोन कोटी, मुखेड ते ओडीआर ३८ रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दोन कोटी, न्यू बोराडी ते चोंदीपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास अडीच कोटी, बोराडी ते खाऱ्याखानपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दीड कोटी, फत्तेपूर बोरपाणी रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास एक कोटी,

तोंदे (गोरक्षनाथ मंदिर) ते मलखान नगर, हिसाळे रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दोन कोटी, खैरखुटी ते चाचऱ्यापाणी रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास दीड कोटी, बभळाज ते हिवरखेडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारण दीड कोटी,

हिवरखेडा ते रामबर्डी रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास पाच कोटी, हिगाव ते नाटूपाडा रस्ता व पूल बांधकामास नऊ कोटी, हिवरपाडा ते झारीपाडा रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास साडेतीन कोटी, टेंभेपाडा-नवापाडा-बुडकीविहीर रस्ता बांधकाम व जलनिस्सारणास अडीच कोटींचा निधी मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

T20 World Cup: "वर्ल्ड कपमध्ये घ्यायला पाहिजे होतं राव !"; सुनील अण्णाच्या जावयासाठी रितेश देशमुखची बॅटिंग, झाला ट्रोल

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे यांच्या भेटीला शिवसेनेचे उमेदवार

SCROLL FOR NEXT