Officials and activists of Shiv Sena shouting slogans against Municipal Corporation at entrance of the garden on the bank of Panzra river esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 5 कोटींच्या गार्डनचा उद्‍घाटनापूर्वीच सत्यानाश; शिवसेनेचा आरोप कोणावर?

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्य शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा योजनेंतर्गत महापालिकेने शहरातील पांझरा नदीकाठी पाच कोटी रुपये खर्चातून बगिचाचे काम केले. ९० टक्के काम झालेल्या या गार्डनचा मात्र उद्‍घाटनापूर्वीच सत्यानाश झाला आहे, असा आरोप करत शिवसेनेने तेथे आंदोलन केले. मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. (garden in dhule city worth rs 5 crores destroyed before opening shivsena allegation political news)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध कामांत भ्रष्टाचार झाल्याचा व त्यामुळे कामे निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांच्या अनुषंगाने पक्षातर्फे दहा दिवसांपासून आंदोलनातून कामांचा निकृष्ट दर्जा दाखविण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता. २०) शहरातील पांझरा नदीकाठावर राज्य शासनाच्या मूलभूत सोयी-सुविधा योजनेंतर्गत महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपये खर्चातून गेल्या चार वर्षांपासून अत्याधुनिक गार्डनचे काम सुरू आहे. ऑडिटोरियम, बगिचा, भूलभुलय्या, कारंजा, जॉगिंग ट्रॅक आदी कामांचा यात समावेश आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

दरम्यान, बगिचाच्या संरक्षक भिंतीवरचे प्लॅस्टर, ऑडिटोरियममधील बैठकव्यवस्थेतील फरश्या उद्‍घाटनापूर्वीच उखडत आहेत. लाखो रुपयांची फुले व शोभेची झाडे काही ठिकाणी जळून गेली, तर काही ठिकाणी झाडांनी माना टाकल्या आहेत. भिंतीवर तडे गेले आहेत.

कारंजाच्या टाइल्स निघून आल्या आहेत. बांधकाम डेब्रिजमुळे संरक्षक भिंतीलगतची झाडे शेवटच्या घटका मोजत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. बगिचाच्या संबंधित ठेकेदाराकडून योग्य प्रकारे काम करून घ्यावे, अशी मागणीही शिवसेनेने केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, भटू गवळी, प्रवीण साळवे, संजय जवराज यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गार्डनच्या प्रवेशद्वारात मनपाच्या भ्रष्टाचारावर घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT