Savaryadigar (T.Dhadgaon) : Administration while delivering grain stock through tractors in very remote areas. While the laborers are unloading the grain stock from the truck. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : दुर्गम भागातील 64 गावांमध्ये धान्यसाठा पोचला; 4 महिन्यांचा पुरेल एवढा साठा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : पावसाळ्यात सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात नर्मदा काठावरील गावांचा संपर्क तुटतो.त्यामुळे तेथील नागरिकांना पावसाळ्याचे चार महिने पुरेल एवढा धान्यसाठा जिल्हा प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर पोचवण्यात आला. संपर्क तुटणाऱ्या दुर्गम भागातील ६४ गावांमध्ये हा धान्यसाठा पोचला आहे.

पावसाळ्यात सातपुड्याच्या दुर्गम भागात सरदार सरोवरच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे तसेच वेगवेगळ्या नद्या, नाल्यांना पूर येत असतात. त्यात दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या संपर्क तुटत असतो. (Grain stocks reached 64 villages in remote areas Pre Monsoon Precautions Storage enough for four months Nandurbar News)

त्यांची उपासमार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने तातडीने जेथपर्यंत वाहने पोचतील तिथपर्यंत ट्रक तसेच, ट्रॅक्टरच्या सहाय्याने व नंतर तेथून गाढवांच्या मदतीने पाड्यापर्यंत धान्यसाठा पोचवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत

दुर्गम भागातील ६४ गावांसाठी काही गावांना धडगाव येथून तर काही गावांना शहादा भागातून धान्य पोचवले आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात कुपोषणामुळे सातत्याने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले जातात. अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते.

हा सारा प्रकार बघता पावसाळ्यात आदिवासी बांधवांना त्रास होऊ नये, त्यांना मुबलक धान्य मिळावे म्हणून जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांसाठी धान्य साठा उपलब्ध केलेला आहे. धडगाव भागातून मनीबेली पर्यंत तर शहादा भागातून तोरणमाळमार्गे सिंधीदिगर पर्यंत टप्प्याटप्प्याने वाहनांनी व गाढवांच्या मदतीने धान्य पोचवले आहे. धान्य पोचवताना अधिकाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

५२ हजार ५९५ नागरिकांना लाभ

जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेतील दऱ्या खोऱ्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम अशा ६४ गावांमध्ये राहणाऱ्या ५२ हजार ५९५ नागरिकांना पाच हजार ५२० क्विंटल गहू, १६ हजार १०९ क्विंटल तांदूळ पोचविण्यात आले आहे.

महाराष्ट्र , मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उड्या, बादल, भामने, सावऱ्यादिगर, भाबरी, मनीबेली, धनखेडी, चिमलखेडी, डनेल हा भाग अतिदुर्गम असून पावसाळ्यात या भागात वाहने जात नसल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या.

या भागातील नवसंजीवनी अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना औषध साठा आणि धान्यसाठा ही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या गावांमध्ये बारमाही रस्ते झाल्यास या गावातील समस्या सुटू शकणार आहेत. यावेळी उदयनदीवरील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आणि रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

"तोरणमाळ परिसरातील शहादा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या आठ स्वस्त धान्य दुकानांचे धान्य तोरणमाळमार्गे दुर्गम भागात पोचवण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये ही भूमिका महत्त्वपूर्ण असून यासाठी शहादा तहसील विभागातील अधिकाऱ्यांनी सहकार्य केले."

दीपक गिरासे, तहसीलदार, शहादा

"उदय नदीमुळे व सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे पावसाळ्यात आमच्या संपर्क तुटतो. नर्मदा घाटीतील नागरिकांना यावेळी धोका निर्माण होतो. बारमाही रस्ते होणे आवश्यक आहे. चार महिने नागरिकांना पुरेल एवढे धान्य प्रशासनाने पोचवले आहे. गहूतांदूळ असे धान्य आले. पावसाळ्यात शासकीय अधिकारी संपर्कात असतात, चार महिने पुढे धान्य साठा दिला जातो."

- राहड्या पावरा, सावऱ्यादिगर ता. धडगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT