Speaking at the mid-day meal distribution program, Guardian Minister Dr. Vijayakumar village and present villagers.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : बारमाही रस्त्यांसाठी 1 हजार कोटींची तरतूद : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील गाव, पाडे, वस्ती बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी येत्या काळात एक हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. (Guardian Minister Dr Vijaykumar gavit statement about perennial road funding nandurbar news)

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभाचे वितरण डॉ. गावित यांच्या हस्ते रविवारी (ता. १८) अक्राणी तालुक्यातील आचपा, उमराणी बुद्रुक, भोगवाडे बुद्रुक, धनाजे बुद्रुक, बोरवण गावात झाले. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या सदस्या नीलिमा पावरा, सरपंच रंजनीबाई पावरा (आचपा), आशाबाई पावरा (उमराणी बुद्रुक), उपसरपंच पुष्पा पावरा (आचपा), अनिता पावरा (उमराणी बुद्रुक), सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतिलाल टाटिया यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. गावित म्हणाले, की येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आला असून, प्रत्येक गाव, वाडे, पाडे, वस्तीच्या ठिकाणी बारमाही जोडण्यासाठी एक हजार ३०० कोटींची योजना तयार करण्यात आली असून, या रस्त्यांमुळे नागरिकांना कुठल्याही पाड्या व वस्त्यांमध्ये जाणे सोयीचे होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येत्या जुलै महिन्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या नागरिकांकडे घरे नाहीत आणि ‘ड’ यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना अर्ज केल्यावर सहा महिन्यांत घरे देण्यात येतील. घरकुल योजनेंतर्गत एका कुटुंबाला एकच घर मिळत असल्याने विभक्त कुटुंबाने आपले विभक्त कुटुंब म्हणून नोंदणी करावी.

डॉ. गावित पुढे म्हणाले, की महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण विभागातर्फे बांधकाम कामगारांना आरोग्यविषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामागाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संचवाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामगारांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करणे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कामगार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT