gudi padwa 2023 purchase of various items on occasion of Gudi Padwa created new consciousness in market dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Gudi Padwa 2023 : खरेदीतून घरोघरी नवचैतन्याचा गोडवा; गुढी उभारून जय श्रीरामाचा जयघोष!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त धुळेकरांनी विविध वस्तूंची बुधवारी (ता. २२) खरेदी केल्याने बाजारपेठेत नवचैतन्याचा गोडवा निर्माण झाला. (gudi padwa 2023 purchase of various items on occasion of Gudi Padwa created new consciousness in market dhule news)

फोर के टीव्ही, डबलडोअर फ्रीज, एसी, स्मार्टफोन्सची सर्वाधिक खरेदी झाली, तसेच चारशेवर दुचाकी, दीडशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री झाली. अनेकांनी नवीन फ्लॅट, रो-हाउससह प्लॉटची खरेदी केली. काहींनी गृहप्रवेश केला. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली.

गुढीपाडव्यानिमित्त शहरात घरोघरी आणि चौकाचौकांत गुढी उभारण्यात आली, तसेच श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करीत जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला सुरवात होते.

नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी, वास्तुप्रवेशाची परंपरा आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील शोरूम सजल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आघाडीवर आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

शहरात सकाळपासूनच खरेदीची लगबग दिसून आली. या शुभमुहूर्तासाठी शहरात चारशेवर चारचाकी आणि दीडशेवर दुचाकींचे बुकिंग झालेले होते. दोनशेवर घरांचेदेखील बुकिंग झालेले होते. दोनशेवर कुटुंबांनी नवीन घरात गृहप्रवेश केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सराफ बाजारही सज्ज होता. २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर गेले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनीही सवलत योजना जाहीर केल्या आहेत.

गुढीपाडव्यानिमित्त गुढीसह काठी, हार-कंगण, फुलहाराची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या सणानिमित्त दूध, बासुंदी, श्रीखंड, जिलबी, गुलाबजाम व इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दुधासाठी डेअरीवर रांगा होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT