Cupboard broken by thieves  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिरपूर येथे प्राध्यापिकेकडे भरदुपारी घरफोडी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : प्राध्यापिकेच्या घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड मिळून ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला. ही घटना गुरुवारी (ता. २२) दुपारी घडली.

येथील सावित्रीबाई रंधे कन्या कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या जयश्री शशिकांत कुलकर्णी शहरातील सुभाष कॉलनीतील प्लॉट क्रमांक ५७ ब मध्ये राहतात. (home burglary of teacher in Shirpur dhule crime news)

त्या सकाळी शाळेत गेल्या होत्या. वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरूही बाहेरगावी गेले होते. दुपारी पाऊणला त्या घरी परतल्या. त्यांना घराच्या दाराला कुलूप घातलेली कडी तोडल्याचे आढळले.

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता तेथील कपाटामधील साहित्य उचकटल्याचे दिसले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या घरफोडीत ३७ हजार ५०० रुपये किमतीची दीड तोळे सोन्याची पोत, सहा हजार २०० रुपये किमतीची सोन्याची कर्णभूषणे, साडेसात हजार रुपये किमतीची तीन ग्रॅमची अंगठी, चार हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या समया आणि वाटी,

चांदीचे दोन पेले, देवताम्हण, पंचपळीसह ४३ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. या मुद्देमालाची एकूण किंमत ९८ हजार २०० रुपये आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT