gold chain returned.jpg
gold chain returned.jpg 
उत्तर महाराष्ट्र

#TuesdayMotivation : सत्तर हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र 'त्याने' केले परत..कोण होता तो?

दिगंबर पाटोळे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वणी येथील सप्तश्रृंगी आदिमायेच्या दर्शनासाठी मंदीरात जाणाऱ्या 'त्या' भाविक महिलेला कळालेही नाही, की गळ्यातील मंगळसुत्र पडल्याचे... मात्र सप्तशृंगी गडावरील फनिक्युलर ट्रॉली रोपवे कर्मचाऱ्याने सापडलेले सोन्याचे मनीमंगळ सुत्र महिला भाविकाचा शोध घेवून प्रामाणिकपणे परत केले आहे.

अशी घडली घटना...
सप्तश्रृंगी गडावरील रोपवेचे कर्मचारी महेंद्र उर्फ बाळा काशिनाथ झोटिंग मंदीराजवळी अपर स्टेशनवर शनिवारी (ता.२४) दुपारी कार्यरत असतांना रोपवे ट्रॉलीतून उतरुन मंदीरात दर्शनासाठी जाणाऱ्या अज्ञात महिलेचे पायऱ्यांवर पडलेले मनीमंगळ सुत्र सापडले. यानंतर सदरची मनीमंगळ सुत्र कोणत्या महिलेचे पडले. हे बघण्यासाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात जावून सीसीटीव्हीवर फुटेज तपासले. यावेळी एक महिला घाई गर्दीत पायऱ्या चढतांना तिच्या गळ्यातील मंगळसुत्र पडतांना दिसले. दरम्यान ती महिला व सोबत असलेले पती दर्शन घेवून खाली उतरण्यासाठी अपर स्टेशनवर आले असता, महेंद्र झोटिंग, ट्रॉली ऑपरेटर पाटील व सुरक्षारक्षक पवार यांनी कोणाचे मंगळसुत्र हरवले आहे का, याबाबत विचारणा केली यावेळी सोनल निभोरे,(रा. पुणे) या महिलेने आपला गळा तपासला असता त्यांना गळ्यात मंगळसुत्र नसल्याचे कळाले व माझेच मंगळसुत्र हरविल्याचे सांगितल्यानंतर तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याच महिलेचे छायाचित्रण दिसल्याने महेंद्र झोटिंग यांनी भाविकांची शहानिशा करीत सापडलेले सुुमारे ७० हजार किमंतीचे सोन्याचे मंगळसुत्र प्रामाणिकपणे परत केले.

प्रामाणिकतेबद्दल कौतुक

यावेळी सदर महिलेच्या पतीने बक्षीस म्हणून काही रक्कम देवू केली, मात्र महेंद्र झोंटिग यांनी लालच न ठेवता, उलट आपले दाग दागिने गर्दीच्या ठिकाणी सांभाळण्याबाबत सुनावले. दरम्यान महेंद्र झोटिंग यांच्या प्रामाणिकतेबद्दल रोपवेचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, कार्यालयीन व्यवस्थापक सोपान कोनमंडले आदीसंह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT