esakal
उत्तर महाराष्ट्र

Summer Heat Rise : उन्हाच्या तडाख्याने शीतपेयांच्या विक्रीत वाढ!

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने दुग्धजन्य शीतपेये तसेच इतर पदार्थांच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. (Increase in sales of soft drinks due to hot summer Nandurbar News)

साधे ताक, दही, लस्सी, आइस्क्रीम, श्रीखंड, आम्रखंड, कोल्ड्रिंक्स आदी प्रमुख पदार्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची झळ लवकर बसत आहे. यामुळे मागील वर्षापेक्षा शीतपेयांच्या विक्रीत वाढ झाली आहे. हॉटेल, बेकरी, चहाच्या टपऱ्या, शीतपेयांची विक्री करणारे पार्लर या ठिकाणी चांगलीच गर्दी दिसून येते.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ही मागणी वाढण्यास सुरवात झाली होती. आता एप्रिलच्या अखेरीस मागणीत दुपटीने वाढ झाली आहे आणि मे महिन्यात यात आणखी वाढ होऊ शकेल. सध्या ग्राहकांची दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम, मॅंगो लस्सी, श्रीखंड, आम्रखंडाला मागणी वाढली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरवातच तीव्र झाल्यामुळे शाळेतून परतणारे विद्यार्थी, वृद्ध महिला व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचा कूलर खरेदीकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या डेझर्ट कूलरसह नामांकित ब्रॅन्डेड कूलरही बाजारात दाखल झाले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रवाशांकडून बाटलीबंद थंड पाण्याची मागणी वाढली असून, आइस्क्रीम, कूल्फी व शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सरबत, लस्सी, ताक, शिकंजी, उसाचा रस आदींना मागणी वाढली आहे. शरीरात गारवा निर्माण करणारे कलिंगड, काकडीसह एसी, कूलर, गॉगल, स्कार्फ खरेदीस नागरिक पसंती देत आहेत.

तहान शमविण्यासाठी माठातील थंडगार पाणी पिणे बहुतेकांना आवडते. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रीज असूनही माठ विकत घेणारे अनेक जण दिसून येत आहेत. दुपारच्या वेळेत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी शेतकरी सकाळी लवकर कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे ऊन, तर दुसरीकडे अधूनमधून अवकाळी पाऊस नागरिकांना जास्त त्रासदायक ठरत आहे.

राजस्थानी शिकंजीला पसंती

गेल्या काही वर्षांपासून जिल्हाभरात उन्हाळ्यात परप्रांतीय शिकंजी नामक शीतपेय विक्रीसाठी येतात. लहानशा चारचाकी हातगाडीवरील शिकंजीला चांगलीच पसंती मिळतेय. सब्जा, साखर, काळे मीठ, निंबू यांचे गार पाण्यातील मिश्रण लोक हौशीने पितात. ही शिकंजी बाजारात निंबू-सरबतची स्पर्धक म्हणून आहे.

कूलर दुरुस्ती, विक्रीत वाढ

वातावरणातील तापमानात वाढ झाल्यामुळे कूलर विक्री व दुरुस्तीसहित इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी व दुरुस्तीची कामे वाढली असून, यंदाचा उन्हाळा कठीण जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला रहदारी कमी झाली आहे. या वाढत्या तापमानातून‌ सुटका मिळण्यासाठी सध्या घरातील कूलरची दुरुस्ती तसेच नवीन कूलरची खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रिक दुकानात नागरिकांची गर्दी दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT