iStock-629726322.jpg 
उत्तर महाराष्ट्र

कळवणच्या गर्भवतींसाठी संजीवनी ठरताय ही केंद्र...

रवींद्र पगार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कळवण येथील रुग्णालयांमध्ये अनेकदा रक्ताचा तुटवडा भासत असल्याने गरजवंताला प्राणाला मुकावे लागते. मात्र, कळवण उपजिल्हा रुग्णालय याला अपवाद असून, रुग्णालयातर्फे स्थापनेपासून ते आजपर्यंत सहा हजार 500 रक्तपिशव्यांचा पुरवठा झाल्याने ते 'संजीवनी' ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात 2006 ला रक्त साठवणूक केंद्र कार्यान्वित झाले. शेतीकामात व्यस्त असलेल्या माता बऱ्याच वेळा उशिराने रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयापर्यंतचा गर्भवतींचा प्रवास दुर्गम भागातील रस्त्यांमुळे खडतर होतो. 

रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी 'संजीवनी'   


रुग्णालयात जोखमीच्या प्रसूतींचे प्रमाण अधिक आहे. प्रसूतीदरम्यान अधिकच्या रक्तस्रावामुळे माता दगावण्याची शक्‍यता वाढते. अशावेळी रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी 'संजीवनी' ठरत आहे. शासकीय रुग्णालयात नैसर्गिक प्रसूती अधिक होत असल्या, तरीही अपवादात्मक परिस्थितीत शस्त्रक्रिया (सिझेरियन) प्रसूती करून मातेची वेदनेपासून सुटका केली जाते. त्यासाठी रक्त साठवणूक केंद्राची मदत होऊन सिझेरियन करणे सोपे होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश लाड व डॉ. प्रीती गावित यांनी सांगितले. सिझेरियन करताना रक्त पिशवीतून रक्त द्यावे लागते. अशावेळी रक्त साठवणूक केंद्र आधारभूत ठरत असल्याचे भूलतज्ज्ञ डॉ. सारिका चव्हाण यांनी सांगितले. 

देवळा, बागलाण तालुक्‍यातील मातांसाठी देखील जीवनदायी 

देवळा, बागलाण तालुक्‍यांतून संदर्भीत होणाऱ्या मातांसाठी जीवनदायी सिद्ध होत आहे. रक्त साठवणूक केंद्रास जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीतून रक्त पिशव्या उपलब्ध होतात. रक्तपेढी तंत्रज्ञ उदय बस्ते रक्त पिशव्यांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. रुग्णालयात आदिवासी क्षेत्रातील रुग्णांची संख्या मोठी असून, रुग्णांमध्ये पूरक आहाराचा अभाव, आरोग्यबाबतच्या उदासीनतेमुळे रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळते.

रक्तदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक 

कळवण तालुका गुजरातजवळ असल्याने रस्ते अपघातातील जखमींची संख्या मोठी असते. परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी केले. वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व श्री गुरुदत्त शिक्षण संस्था, मानूर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने वर्षात सहा शिबिरे होतात. त्यातून सरासरी 500 रक्त पिशव्यांचे संकलन होते. 

हेही वाचा> Union Budget 2020 : आवास योजनेची व्याप्ती वाढल्यास अर्थव्यवस्थेला चालना! 
उपजिल्हा रुग्णालयात 458 रक्त पिशव्या

जानेवारी-31, फेब्रुवारी-57, मार्च-65, एप्रिल-29 
मे-33, जून-18, जुलै-38, ऑगस्ट-62, सप्टेंबर-23 
ऑक्‍टोबर-29, नोव्हेंबर-28, डिसेंबर-45 

प्रतिक्रिया

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, आम्ही दर वर्षी लोकनेते संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिर घेतो. त्यातून गर्भवतींना जीवदान मिळत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. 
शैलेश पवार, अध्यक्ष, गुरुदत्त शिक्षण संस्था 


कळवणच्या केंद्राचे काम कौतुकास्पद असून, यापुढेही पिशव्यांचा कायमच तत्काळ पुरवठा करण्यात येईल.
डॉ. प्रतिभा पगार, प्रभारी, मेट्रो रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, नाशिक 
 

रक्त साठवणूक केंद्रामुळे अधिकाधिक रुग्ण, गर्भवती तसेच प्रसूत मातांची सोय व्हावी, यासाठी अधिकाधिक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा. 
डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कळवण 
हेही वाचा> 'सीएए'द्वारे वेगळे पाडण्याचे सरकारचे षडयंत्र : मुस्लिम मंचची भूमिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT