sanjay sawant
sanjay sawant 
उत्तर महाराष्ट्र

Video खडसे शिवसेनेत आल्यास पक्षाला फायदाच! : संजय सावंत 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांची शिवसेनेबाबत एकेकाळी टोकाची भूमिका होती. त्यावेळी ते त्यांचा पक्ष वाढविण्याचे कार्य करीत होते. मात्र, एवढे करूनही भाजपने त्यांच्यावर अन्याय केला आहे. आता शिवसेनेत आल्यास त्यांचे स्वागत आहे. ते शिवसेनेतही तेवढ्याच जोमाने काम करून पक्ष वाढवतील व त्यांचा पक्षाला फायदाच होईल, असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी व्यक्त केले. 

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर त्यांनी जिल्ह्यातील आमदार तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पद्‌मालय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना योग्य तो मान दिला जाईल. गेल्या पाच वर्षांत शिवसेना कार्यकर्त्यांना जिल्ह्यात अत्यंत वाईट वागणूक मिळाली. ज्यांनी ही वागणूक दिली त्यांना पायबंद घालण्यासाठी खडसे यांचा आम्हाला फायदा होईल. त्यांच्या शिवसेनेत येण्याबाबतही शिवसेना कार्यकर्त्यांत चांगली भावना आहे. आपण खडसे यांच्याशीही चर्चा करणार आहोत. 

महापालिकेबाबत सर्वांशी चर्चा 
जळगाव महापालिकेतील सत्ताबदलाबाबत सावंत म्हणाले, की याबाबत कोणतीही घाई करण्यात येणार नाही. सर्वांशी चर्चा करून त्याबाबत आपण निर्णय घेणार आहोत. विरोधी पक्षातील जे नगरसेवक आमच्यासोबत येण्यास तयार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. मात्र, जळगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. विकासाबाबत आम्ही नेते सुरेशदादा जैन यांच्याशीही चर्चा करणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT