उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : साक्रीतील 3 गुन्ह्यांची उकल; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

घरफोडी प्रकरणातील संशयितांसह मुद्देमालाच्या पाहणीवेळी उपस्थित अधीक्षक संजय बारकुंड, पोलिस अधिकारी व पथक.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : साक्री तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, साक्री पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.

तिघा चोरट्यांवर नंदुरबार शहर, तालुका, उपनगरसह साक्री, पिंपळनेर, निजामपूर व धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

साक्रीतील छोरिया टाउनशिपमधील जयवंत पांडुरंग जाधव (वय ४३) यांच्याकडे २७ जुलैला चोरट्यांनी घरफोडी केली. (LCB team arrested 3 house burglars in Sakri taluka and Nandurbar district dhule crime news)

या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू होता.

यादरम्यान एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मोटारसायकल गॅरेजचालक हेमंत अनिल सोनवणे (वय २५, रा. धनेर, ता. साक्री) व मजूर अनिल गणेश पवार (वय २४, रा. तोरणकुडी, ता. साक्री) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. साक्रीत यापूर्वी दोन ठिकाणी घरफोडी केली असल्याचे त्यांनी कबूल केले.

दोघांकडे गुन्ह्यातील सोने-चांदीच्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मुद्देमाल भटू राजेंद्र सोनार (रा. शिवाजी चौक, नंदुरबार) व केवल भटू सोनार (रा. शिवाजी चौक, नंदुरबार) यांना विक्री केल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार भटू सोनार यास ताब्यात घेण्यात आले. दोघा चोरट्यांकडून घरफोडीतील लाखाची रोकड, ४० हजारांची दुचाकी (एमएच १५, डीई ६०९९) व भटू सोनार याच्याकडून पाच हजारांच्या चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. तिघांना साक्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गुन्ह्यातील संदीप ऊर्फ तुलसीराम भिलू चौरे (रा. मचमाळ, ता. साक्री) व अन्य एका सोनाराचा शोध सुरू आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, राहुल गिरी, मयूर पाटील, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Baramati: बारामतीमध्ये विदेशी दारुचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - पनवेल – कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पांतर्गत अडथळे दूर करण्याच्या कामांसाठी विशेष पॉवर ब्लॉक्स

५८ व्या वर्षीही माधुरी दीक्षितची त्वचा इतकी नितळ कशी? मुळीच चुकवत नाही 'या' तीन गोष्टी; म्हणते- सुंदर दिसण्यासाठी...

SCROLL FOR NEXT