उत्तर महाराष्ट्र

तिसरा कोरोनाग्रस्त आढळल्याने धुळे जिल्हा हादरला...

निखिल सूर्यवंशी

धुळे: जिल्ह्यात तिसरा आणि धुळे शहरात दुसरा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने यंत्रणा हादरली आहे. तीन पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दौरा करत स्थितीचा आढावा घेतला. उपाययोजनांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्तांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.  

आर्वजून पहा :"कोरोना' लढ्यात आता शिक्षकांची मदत घेणार; काय आहे "कोविड गार्ड...

जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण साक्री शहरात आढळला. त्याचा मृत्यू झाला. या शहरात संसर्गजन्य आजार पोहोचला कसा ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन आठवड्यानंतर धुळे शहरात सोमवारी (ता. 21) तिरंगा चौक परिसरात एका प्रतिष्ठिताच्या भावाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मालेगावला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तेथे तीन वेळा "तो' गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. संपर्कातील "त्या' प्रतिष्ठीतासह 91 जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. 

नक्की वाचा :"लॉकडाउन'मध्ये मद्य तस्करी...दुकानानंतर गुदामाचा परवानाही रद्द ! 

असे असताना धुळे शहरातील दाट वस्तीच्या भागातील 57 वर्षीय पॉवरलूम व्यावसायिक व शेतकऱ्याचा आज (मंगळवार) पहाटे मृत्यू झाला. नंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय यंत्रणेला दुपारी प्राप्त झाला. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अजीज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शासनाच्या निर्देशानुसार धुळे शहरातील कोरोना बाधित सरासरी एकूण दहा किलोमीटरपर्यंतच्या परिघातील क्षेत्र "सील' केले आहे. तेथे चौदा दिवस संचारबंदी राहील. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील. बाधित रुग्णांचा संपर्क आलेले तीन दवाखाने महापालिकेने दक्षतेसाठी "सील' केले आहेत. संभाव्य रुग्ण संख्या वाढल्यास सोयीसाठी विविध रुग्णालये, संस्थांच्या इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या स्थितीत शासनाच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व रेशनधान्य वाटपातील मापात पाप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला. दरम्यान, तीन मेपर्यंत "लॉक डाऊन' जाहीर आहेच. मात्र, धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची रूग्ण संख्या तीनवर गेल्याने दक्षतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे शहरात दोन दिवस संपूर्ण "लॉक डाऊन'चा आदेश लागू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT