Dhule Municipal Corporation 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात शिवसेनेचे अनोखे आंदोलन;मनपा प्रवेशद्वारात घटस्थापना

महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या अनुषंगाने काहीही काम केले नाही.

सकाळ वृत्तसेवा

धुळे ः महापालिकेने (Dhule Municipal Corporation) नवरात्रोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविले नाहीत, तर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर घटस्थापना करून नऊ दिवस ठिय्या आंदोलन (Movement) करू, असा इशारा शिवसेनेने (Shiv Sena) दिला होता. महापालिका सत्ताधाऱ्यांनी याबाबत काहीही काम न केल्याचा आरोप करत शिवसेनेने मनपा प्रवेशद्वारात घटस्थापना करून पुढील नऊ दिवसांचे आंदोलन सुरू केले. यानंतर महापालिका नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असेल.


शहरातील खड्ड्यांप्रश्‍नी धुळेकर नरकयातना भोगत आहेत. या याचनेतून त्यांची सुटका करण्यासाठी मालमत्ता करापोटी लोक अदालतीच्या माध्यमातून जमा झालेल्या ८० ते ८५ लाखांच्या निधीतून किमान खडी-मुरूम टाकून शहरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी शिवसेनेने केली होती. तसे खुले पत्रच शिवसेनेने महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र या पत्रानंतरही झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या अनुषंगाने काहीही काम केले नाही, असा आरोप करत शिवसेनेने गुरुवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारात घटस्थापना केली.


दरम्यान, नवरात्रोत्सवापासून नऊ दिवस येथे शिवसेनेतर्फे आंदोलन सुरू राहील, असेही शिवसेनेने म्हटले आहे. या आंदोलनात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख मनोज मोरे, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, संदीप चव्हाण, नितीन शिरसाट, संदीप सूर्यवंशी, देवा लोणारी, रामदास कानकाटे, पंकज भारस्कर, सचिन बडगुजर, मच्छिंद निकम, शेखर बडगुजर, योगेश मराठे, योगेश चौधरी, प्रमोद चौधरी, आबा भडागे, संजय वाल्हे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता जोशी, उपजिल्हा संघटक सुनीता वाघ, शहरप्रमुख अरुणा मोरे, महानगर संघटक डॉ. जयश्री वानखेडे, योगिता मजरे, कविता वाघ, मनीषा शिरोडे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Stock Market Closing Bell : शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात बंद; सेसेक्स 519 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

IPL 2026 : KL Rahul च्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सने KKR समोर ठेवले तीन पर्याय, कोलकाता फ्रँचायझीने दाखवला ठेंगा

ODI Rankings: स्मृती मानधनाच्या सिंहासनाला धक्का! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला टेन्शन देणारी फलंदाज बनली नंबर वन

SCROLL FOR NEXT