remdesivir remdesivir
उत्तर महाराष्ट्र

धुळे महापालिकेला मिळाले चारशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन !

५० हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांना उसनवार तत्त्वावर देण्यात आली

निखील सुर्यवंशी



धुळे ः कोरोनाप्रश्‍नी महापालिकेने मायलन कंपनीकडे सहा हजार ३०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यात पंधराशे इंजेक्शनसाठीचा निधी कंपनीला दिला आहे. त्यातून चारशे इंजेक्शन गुरुवारी प्राप्त झाली. पैकी ५० हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांना उसनवार तत्त्वावर देण्यात आली.

खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभागृहनेते राजेश पवार, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसेवक नागसेन बोरसे, युवराज पाटील, भिकन वराडे, प्रवीण अग्रवाल, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.

शहरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा
डॉ. भामरे यांच्या हस्ते डॉ. शेजवळ यांच्याकडे इंजेक्शन सोपविण्यात आली. महापालिकेने बेंगळुरू येथील मायलन कंपनीकडून इंजेक्शन खरेदी केली आहेत. दरम्यान, महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभेत सभापती संजय जाधव यांनी शहरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासत असताना, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. भामरे, श्री. अग्रवाल आणि महापौर सोनार यांच्या प्रयत्नाने चारशे रेमडेसिव्हिर प्राप्त झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो मंजूर करण्यात आला.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

Nagarpalika Election: नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम कसा? आचारसंहितेचा नियम काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या एका क्लिकवर

Diabetes Causes Dementia: साखर फक्त शरीरालाच नाही, मेंदूलाही करते ‘डॅमेज’! तज्ज्ञांनी दिला डिमेंशियाच्या धोक्याचा इशारा

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : कौटुंबिक वादातून मुलानेच केली जन्मदात्याची हत्या

SCROLL FOR NEXT