उत्तर महाराष्ट्र

बिबट्यासमोर सेल्फी अन्‌ मग झाले असे... 

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : काळगाव (ता.साक्री) गावालगत हाकेच्या अंतरावरील कामत शिवारात शनिवारी सायंकाळी मजूरावर बिबट्याने हल्ला केला. अनेकांच्या नजरेसमोर बिबट्याने हाताच्या पंजाचा चावा घेतला. शिवाय तरुण पोलिस पाटील यांना देखील बिबट्याने पंजा मारला. जखमी वनमजूरावर धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात गर्दी झाल्याने चवताळलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा आहे. 

काळगाव वनक्षेत्रात लगतच्या शेत शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा मुक्त संचार आहे. शनिवारी सायंकाळी वनमजूर पंडित यादवराव खैरनार, वसंत दावल खैरनार, एकनाथ साहेबराव गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांना गावालगतच्या शिवारात बिबट्या असल्याची माहिती मिळाली. बिबट्यास पांगविण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. दबा धरलेल्या बिबट्याने वनमजूर पंडित खैरनार यांच्यावर हल्ला चढवला. झटापटीत खैरनार यांच्या उजव्या हाताच्या पंजाचा चावा घेतला. तर सोबत असलेले पोलिस पाटील प्रा. गणेश देसले यांच्या पायावर देखील पंजा मारत ओरखडे ओढले. ग्रामस्थांनी आरोळ्या मारल्याने बिबट्याने वनक्षेत्राकडे धुम ठोकली. दिघावे येथील वनपाल डी. डी. चौधरी, युवक मनोज खैरनार, संभाजी ठाकरे, नारायण मोहिते, रमेश ब्राह्मणे, राकेश खैरनार आदींनी जखमी पंडीत खैरनार यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पिंपळनेरचे वनक्षेत्रपाल अरुण माळके यांनी रात्री उशिरा रुग्णालयात भेट दिली. 

बिबट्याची दहशत वाढतीच 
काळगावलगत 1 हजार 329 हेक्‍टर वनक्षेत्र आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वनक्षेत्र बहरले असून सुरक्षित वनक्षेत्रात बिबट्याचा वावर आहे. कामत शिवारात बिबट्याच्या जोडीसह दोन बछडे अनेकांनी पाहिले आहेत. रात्रीच काय दिवसाही बिबट्या दर्शन देत असल्याने भिती व्यक्त केली जात आहे. महिन्याभरापूर्वी कृषीभुषण संजय भामरे यांच्या तुडूंब विहीरीत बिबट्या पडला होता. रात्रीच्या भारनियमनामुळे मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. 

युवक सेल्फी काढत असल्याची चर्चा 
अलीकडे सेल्फी काढण्याचे फॅड वाढले आहे. काळगाव येथेही काही तरुण बिबट्या दबा धरून बसलेल्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा आग्रह करत असल्याची आज सकाळी गावात चर्चा होती. आता सेल्फी कुढे आणि कशाची काढावी याचेच भान नसल्याचे स्पष्ट होते. सेल्फीच्या मोहामुळे अनर्थही घडू शकला असता. तर दुसरीकडे बिबट्या विहीरीत पडला तर बघ्यांची गर्दी असते. अशावेळी वन कर्मचारी हतबल होतात. वनमजूरावर हल्ला होऊनही वनविभाग गांभीर्य घेत नसल्याची तक्रार पोलिस पाटील प्रा. गणेश देसले यांनी केली आहे. ठोस उपाययोजना केली जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. 

बिबट्या असल्याची बातमी कळाल्यावर सबंधीत ठिकाणी ग्रामस्थांची गर्दी होती.यामुळे बिबट्या चवताळण्याची शक्‍यता अधिक असते. काळगाव शिवारातही गर्दी होती.शिवाय नर-मादी बिबट्या सोबत असल्याने हल्ला झाला असेल
अरुण माळके, वन परिक्षेत्राधिकारी, 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT