farmers receive loan imege 
उत्तर महाराष्ट्र

अरे वा...142 शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम प्राप्त 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल) व कराडी (ता. पारोळा) येथे 142 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सुमारे 1 कोटी 8 लाख 66 हजार 728 रूपयांची रक्कम आज सायंकाळी जिल्हा बॅंकेकडे "एनईएफटी'द्वारे आला आहे. उद्या (ता.27)जिल्हा बॅंकेकडून संबंधित विका सोसायटीतून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

या कर्जमाफीत हिंगोणा येथील 76 शेतकऱ्यांचे 54 लाख 86 हजार 554 तर कराडी येथील 66 शेतकऱ्यांचे 33 लाख 80 हजार 174 असे एकूण 142 शेतकऱ्यांचे 1 कोटी 8 लाख 66 हजार 728 एवढी आली आहे. या दोन्ही गावातील उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून कर्जमाफीसाठी वरील दोन्ही गावांमध्ये शेतकरी आधार प्रमाणीकरणाची सुरू आहे. आज तिसऱ्या दिवसांपर्यंत 205 शेतकऱ्यांपैकी 195 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित दहा शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण उद्या पूर्ण होईल. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेत 1 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. 

एकूण 1 लाख 51 हजार 200 खात्यापैकी अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरीत्या पोर्टलवर सबमीट झालेल्या कर्ज खात्यांची संख्या 1 लाख 49 हजार 896 असल्याची माहिती उपनिबंधक मेघराज राठोड यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार 677 शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न झाले आहेत. 

जिल्ह्याला मिळणार 
1104 कोटींची कर्जमुक्ती 

जिल्ह्यात जिल्हा बॅंकेच्या शेतकरी सभासदांना एकूण 783 कोटी 45 लाखांची कर्जमुक्ती, तर राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शेतकरी सभासदांना 321 कोटींची अशी जिल्ह्यात एकूण 1104 कोटींची कर्जमुक्ती मिळणार आहे. 
जिल्ह्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी येत्या 28 फेब्रुवारीस शासनातर्फे जाहीर होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT