उत्तर महाराष्ट्र

"लॉकडाऊनमध्ये' जिल्ह्यात या कामांना सुट... वाचा सविस्तर ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून बचावासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. 19 एप्रिलला विविध उद्योग, कृषीवर आधारीत उद्योगांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली होती. आता शासनाच्या सुधारित आदेशानुसार मॉन्सूनपूर्व इमारत दुरुस्तीच्या कामांनाही सूट देण्यात आली आहे. 

महापालिका, पालिकांनी मॉन्सूनपूर्व नाले सफाईची इतर कामे करण्यास लॉकडाउनमध्ये सूट आहे. आता इमारतीचे संरक्षण करण्यासाठीच्या कामांना, शटरींग, वॉटर प्रफुींगचे, पुरापासून धोका होऊ न देण्याबाबची कामे, पायाभूत महत्त्वाची दुरुस्तीचे कामे, पडावू इमारती, घरे पाडण्याची कामांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. ही कामे करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावयाचे आहे. कामाच्या ठिकाणी हात धुण्याची सोय, सॅनिटायझर्स, हॅण्ड वॉशची सोय करावयाची आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. 

कंटेंटमेंट झोन परिसरात बॅंकेचे 
अंतर्गत व्यवहार सुरू 

जळगाव जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कंटेंटमेंट झोन परिसर घोषित करण्यात आले आहे. त्या परिसरातील बॅंकेचे व्यवहारही बंद करण्याची सक्ती पोलिस करीत असल्याचे अग्रणी बॅंकेच्या महाव्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेटमेंट झोन परिसरातील बॅंकेचे अंतर्गत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्राहकांना बॅंकेत व्यवहार करता येणार नाहीत. या झोन परिसरात येणाऱ्या बॅंकांनी ग्राहकांना जास्तीत जास्त ऑनलाइन सुविधांद्वारे सुविधा द्याव्यात, ग्राहकांना बॅंक मित्राद्वारे, पोस्ट खात्यामार्फत सुविधा देण्याचा प्रयत्न करावा असे आदेशात म्हटले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

Gold Rate Today: सोनं सलग 6 व्या दिवशी महाग! 1.5 लाखांचा टप्पा पुन्हा ओलांडला; मुंबईत आजचा ताजा भाव किती?

April Fools Day 2026: एप्रिलच्या पहिल्या दिवशीच का साजरी केला जातो 'एप्रिल फूल्स डे'? जाणून घ्या महत्त्व अन् इतिहास

SCROLL FOR NEXT