cornona 
उत्तर महाराष्ट्र

चाळीसगावचे सर्व कोरोन संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : धुळे येथील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चाळीसगाव येथील 6 जणांना क्‍वारंनटाईन करण्यात आले होते. त्यांच्यासह इतर 34 संशयीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाकडून सुटकेचा निश्‍वास सोडण्यात आला. मात्र सायंकाळी 45 वर्षीय पुरुष तर 60 वर्षीय महिला संशयीताचा मृत्यू झाला. या दोघांचे नमूने तपासीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 

गेल्या काही दिवसात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चाळीसगाव येथील एक कुटूंबिय अंत्यविधीसाठी धूळे येथे गेले होते. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात हे कुटूब आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसानी तात्काळ या कुटूंबाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कुटूंबाला शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंनाटाईन करण्यात आले होते. दरम्यान पाच दिवसानंतर यास सर्व संशयीतांचे नमूने तपासणीसाठी धूळे येथे पाठविण्यात आले होते. आज सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून चाळीसगाव येथील सर्व संशयीतांसह इतर 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

अहवाल निगेटिव्ळ आल्याने समाधान 
दिवसेंदिवस कोरोनाचे संशयीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात होती. यामध्येच धूळे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्‍वारंनटाईन करण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या 30 वर्षीय युवकासह 75 वर्षीय वयोवृद्धांचा अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

दोन संशयीतांचा मृत्यू 
श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शहरातील 45 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्या दोघांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. या दोघ संशयीतांचे नमूने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT