tigar
tigar 
उत्तर महाराष्ट्र

सातपुड्यातील "टायगर कॉरिडॉर' संकटात !

राहुल रनाळकर

जळगाव :  ताडोबा, मेळघाटपेक्षाही जुनं आणि समृद्ध असलेल्या यावल अभयारण्याला गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण आणि वृक्षतोडीचे ग्रहण लागले आहे. काही केल्या हे ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. अनेक वर्षे या जंगलात माणसांचा शिरकाव झालेला नव्हता. आगीमुळे जंगलांची थोडीफार हानी व्हायची. पण, अलीकडे वनक्षेत्रात लागलेला अतिक्रमणांचा "वणवा' हा त्या नैसर्गिक आगींनाही लाजवणारा आहे. आता तर अतिक्रमणाला शिकाऱ्यांचीही जोड मिळाली आहे. वनक्षेत्रातील या नव्या "वणव्या'मुळे सातपुड्यातील शिल्लक असलेला "टायगर कॉरिडॉर' संकटात आहे. काय आहे हा वणवा? काय आहे या वणव्याचे स्वरूप? काय आहेत या वणव्याची कारणे..? 

जगभरात आत्ताशी थैमान घातलेल्या कोरोनाने चंगळवादी आणि भौतिकवादी मानवी संस्कृतीला पुन्हा नैसर्गिक जीवनपद्धतीकडे जाण्याचा मार्ग दाखवायला सुरवात केली आहे. यात निसर्गाचे आणि वनसंपदेच्या समतोलाचे अनन्य साधारण महत्त्व घराघरांत पटू लागले आहे आणि ही बाब भविष्यातील वन्यजीव आणि वनसंपदेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. यावल वनक्षेत्रामध्ये गव्यांचे कळप, वाघ, हत्ती आणि असंख्य दुर्मिळ पक्ष्यांची नोंद यापूर्वी झाली आहे. पण सध्या यावल वनक्षेत्रात माणसांचा विशेषतः अन्य राज्यातून आलेल्या आदिवासी लोकांची वस्ती आणि हस्तक्षेप प्रचंड प्रमाणात वाढलाय. 

दोन बछड्यांची नोंद 
यावल अभयारण्यात चार वर्षांपूर्वी वाघाचे दोन बछड्यांची नोंद झालेली आहे, हे बछडे आता मोठे झाले आहेत. वाघांचा संचार असलेले जंगल म्हणजे वनसंपदा पुनरुज्जीवित होण्याच्या हालचाली म्हटल्या जातात. त्यामुळेच शिकाऱ्यांचा वावरही या जंगलांमध्ये वाढतोय. अलीकडेच वनाधिकाऱ्यांवर झालेला गोळीबार हा याचीच साक्ष पटवून देणारा आहे. 

पाडे चारवरून सोळावर 
काही वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार यावल अभयारण्यात गाडऱ्या, जामन्या, ऊसमळी आणि लंगडाआंबा हे चारच पाडे होते. पण, परराज्यातून येथे बस्तान बसविणाऱ्यांमुळे सध्या या पाड्यांची संख्या तब्बल 15 ते 16 एवढी झालीय. वनक्षेत्रावर, निसर्गावर झालेल्या मानवी आक्रमणाचा, हस्तक्षेपाचा हा सर्वांत मोठा पुरावा आहे. परराज्यातून आलेल्या या लोकांनी वनक्षेत्रात अतिक्रमणाचा अक्षरशः "वणवा' पेटवला आहे. याला कारणीभूत म्हणजे या लोकांचा जागेचा लोभ आणि लाकूड तस्करीतून मिळणाऱ्या प्रचंड पैशांचा हव्यास... या लोकांच्या हव्यासापोटीच "टायगर कॉरिडॉर' आज मोठ्या संकटात सापडला आहे. हा "टायगर कॉरिडॉर' वाचवायचा असल्यास यावल वनक्षेत्रातून हे अनधिकृत लोक बाहेर काढण्याशिवाय अन्य कोणताही मार्ग सध्या तरी दिसत नाही. 

एकीकडे शहरी जनता कोविडशी लढण्यात मग्न आहे, तर दुसरीकडे सातपुड्याच्या टायगर कॉरिडोरमध्ये शिकारी वनसंपदा नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. या शिकाऱ्यांना स्थानिकांची साथ मिळते आणि मग कसा वनक्षेत्रातील अतिक्रमणांचा वणवा कसा पेटत घेतो, वाचा सविस्तर....

सातपुड्यातील टायगर कॉरिडोर संकटात....
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT