chinamrao patil parola
chinamrao patil parola 
उत्तर महाराष्ट्र

VIDEO : काळी ज्वारी हमीभावात खरेदीसाठी प्रयत्न करणार : आमदार चिमणराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : ऑक्‍टोंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी, मका, बाजरी पुर्णपणे काळंवडेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला. यासाठी हमीभाव केंद्रात एफ. ए. क्‍यु. दर्जाच्या धान्याबरोबर काळंवडलेल्या धान्याची खरेदी व्हावी; यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काळ्या ज्वारीला देखील चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आज येथे सांगितले. 

पारोळा येथे आज (ता.5) शासकीय हमीभाव केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, उपसभापती मधुकर पाटील, संचालक चतुर पाटील, डॉ. पी. के. पाटील, प्रा. बी. एन. पाटील, दिपक पिंगळे, प्रकाश वाणी, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. आर. बी. पाटील, शेतकी संघ चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, व्हा. चेअरमन भिकन महाजन आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. 


आमदार पाटील म्हणाले, कि हमीभाव केंद्रात ज्वारीस 2550 तर मका 1760 असे भाव आहेत. आजवर 86 शेतकरी यांनी नोंदणी केली असली तर डिसेंबरअखेर मुदत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करुन हमीभाव केंद्रात आपले धान्य आणावे. केंद्रात जास्तीत जास्त ज्वारी कशी खरेदी करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना विनंती वजा सुचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT