Dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Market Committee Election : धुळ्यात ३२० इच्छुकांचे अर्ज; काँग्रेस आघाडीपुढे भाजपचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरनिराळ्या १८ जागांसाठी मुदतीत ३२० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांची ५ एप्रिलला छाननी होईल. नंतर २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असेल.

बाजार समिती आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियंत्रणात राहिली आहे; परंतु केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने ही निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Market Committee Election Applications of 320 aspirants in Dhule BJP challenge to Congress alliance dhule news)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी (ता. ३) दुपारी तीनला संपली. मुदतीत अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात प्रवेश मिळविला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती.

यात इच्छुक आणि समर्थकांची झुंबड उडाली होती. सेवा सहकारी संस्थेंतर्गत सर्वसाधारण संवर्गासाठी १२१, महिला राखीव २५, इतर मागासवर्ग ३०, विमुक्त जाती व भटक्या जमाती ३७, ग्रामपंचायतींतर्गत सर्वसाधारण संवर्गासाठी ६५, अनुसूचित जाती व जमाती १५, आर्थिक दुर्बल घटक ७, तसेच व्यापारी व अडते घटकातून १३ आणि हमाल व तोलारी घटकातून सात इच्छुकांनी अर्ज भरले.

निवडणूक अधिकारी म्हणून अशोक बागल, सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र विरकर, किरण पाटील, नागेश पुकळे, पंकज लोखंडे, श्री. गोसावी, सुनील मोगरे कामकाज पाहत आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

संचालक मंडळाच्या १८ जागांमध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन आणि हमाल व तोलारी मतदारसंघातून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे.

बाजार समितीचे एकूण चार हजार मतदार आहेत. बाजार समितीची सत्ता राखलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा भाजपचे कडवे आव्हान असेल. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी समितीवर सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.

यात भाजपच्या स्थानिक नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे आव्हान कसे परतवले जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुदतीत माजी सभापती रितेश पाटील, गुलाब कोतेकर, बाजीराव पाटील, योगेश पाटील, बोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, विजय गजानन पाटील, रावसाहेब गिरासे यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बाळासाहेब भदाणे यांनी तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT