According to the Hamal Mapadi Act, former collector Jalaj Sharma in a discussion with market committee representative, trader representative, Hamal Mapadi representative.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakri Bazar Samiti : साक्री बाजार समितीत माथाडी कायदा लागू होणार

सकाळ वृत्तसेवा

Sakri Bazar Samiti : महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्याची न्यायालयाच्या निर्देशानुसार साक्री बाजार समिती आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाजार समित्यांसाठी अंमलबजावणी सात दिवसांत करण्यात येणार असून, याबाबत कायद्यातील तरतुदी, न्यायालयाचे निर्देश यांचा विचार प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी.

तत्पूर्वी याबाबतच्या काही सूचना असतील, तर त्या सोमवारपर्यंत लेखी द्याव्यात, असे आवाहन माजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. (Mathadi Act will be implemented in Sakri Bazar Committee dhule news)

माथाडी कायदा लागू करण्यासंदर्भात येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत माजी जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. प्रांताधिकारी रवींद्र शेळके, तहसीलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, जिल्हा उपनिबंधक, कामगार अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बन्सीलाल बाविस्कर, उपसभापती भानुदास गांगुर्डे, हमाल मापाडी संघटनेचे नेते हेमंत मदाने, तसेच खाजगी बाजार समिती मालक, व्यापारी, हमाल मापाडी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा राज्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात लागू करण्यात आला असताना साक्री बाजार समितीत मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या अनुषंगाने हमाल मापाडी संघटनेतर्फे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यात न्यायालयाच्या आदेशान्वये हा कायदा लागू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांपासून व्यापारी, हमाल मापाडी यांच्यात संघर्ष निर्माण होत आहे. विशेषतः पिंपळनेर उपबाजार समिती, खासगी बाजार समितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

या अनुषंगाने माजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी बैठक घेतली. बैठकीत उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, खासगी बाजार समिती प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापाडी संघटना प्रतिनिधी यांचे मत जाणून घेतले.

कायद्यातील तरतुदी, न्यायालयाचे निर्देश या अनुषंगाने सात दिवसांत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगत, दरम्यानच्या काळात कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करत तसे झाल्यास कठोर कारवाईचे निर्देश माजी जिल्हाधिकारी शर्मा यांनी पोलिसांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

Viral Video: शिल्पा शेट्टीची 'बिबट्या साडी' पाहिलीत का? लाल साडीत हॉट अंदाज, अन् पदरावर भला मोठा बिबट्या

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

SCROLL FOR NEXT