railway (file photo)
railway (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मंत्रालयाकडून 716 कोटींची निविदा मंजूर; रूळकामास लवकरच सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिला टप्प्यातील बोरविहीर (ता. धुळे) ते नरडाणा (ता. शिंदखेडा) या ५६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी ७१६ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. जोधपूर येथील एच. जी. इन्फो इंजिनिअरिंग कंपनीला हे काम मिळाले आहे. ते ३६ महिन्यांत पूर्ण करावे लागेल. यात रूळ आंथरणीच्या कामाला लवकरच सुरवात होईल.

बोरविहीर ते नरडाणा मार्गादरम्यान सात स्थानके विकसित केली जातील. तथापि, धुळे व शिंदखेडा तालुक्यांतील २५ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. (Ministry approves Rs 716 crore tender for 56 km railway line from Borvihir to Nardana dhule news)

मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाची मागील ४० वर्षांपासूनची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग लवकर कार्यान्वित होऊन त्याद्वारे जिल्ह्यासह खानदेशाच्या विकासाला चालना मिळणे अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गासाठी अनेकांनी आंदोलने केली, विविध स्तरांवर प्रयत्न झाले.

सात स्थानकांचा विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने २०१४ मध्ये या मार्गाची पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी २०१९ ला मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता. पहिला टप्पा म्हणून बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाचा श्रीगणेश केला आहे.

यासाठी धुळे आणि शिंदखेडा तालुक्यांतील २५ गावांतील भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गावर बोरविहीर, न्यू धुळे, बाळापूर, निमखेडी, कापडणे, सोनगीर, नरडाणा ही सात स्थानके विकसित केली जातील. रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी ७१६ कोटींच्या निविदेला मान्यता दिली आहे.

कनेक्टिव्हिटीत वाढ

धुळे हे रेल्वेच्या सेंट्रल लाइनवर, तर नरडाणा हे वेस्टर्न लाइनवर आहे. धुळे-नरडाणा हा मार्ग वेस्टर्न आणि सेंट्रल लाइनला जोडणारा दुवा ठरणार असून, जिल्ह्यासाठी तो खूप महत्त्वाचा ठरेल. हा भाग रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढविणारा आहे. या भागात मुंबई-आग्रा, नागपूर-सुरत तसेच धुळे-सोलापूर, दोंडाईचा- मालेगाव, साक्री-पिंपळनेर-नामपूर-देवळा व सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अंकलेश्वर, असे सहा राष्ट्रीय महामार्ग आहेत.

आता नवीन रेल्वेमार्ग पूर्णत्वास आल्यानंतर दळणवळण आणि वाहतुकीसाठी मोठी मदत होईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा ठरेल, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

"बोरविहिर ते नरडाणा पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गासाठी ७१६ कोटींच्या निविदेला मंजुरी मिळाल्याने कामास सुरवात होईल. यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक कॉरिडॉरमध्ये फूड प्रोसेसिंगसाठी धुळे जिल्ह्याची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे."-डॉ. सुभाष भामरे, खासदार, धुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT