molest with woman.jpg 
उत्तर महाराष्ट्र

'ते' थेट कार्यालयात घुसले...महिलांशी अश्‍लील संवाद साधत होते...अचानक...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोड परिसरातील कृषी कंपनीच्या कार्यालयात शिरलेल्या चौघांनी महिलेशी अश्‍लील संवाद साधत तिचा विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत हिरावाडीत युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गंगापूर व पंचवटी पोलिसांत विनयभंगासह पॉस्कोअन्वये गुन्हे दाखल झाले. 

त्यांच्याकडे अश्‍लील नजरेने पाहात असे केले...

गंगापूर रोड परिसरात वनविहार कॉलनीत एका कृषी क्षेत्रातील कंपनीचे कार्यालय आहे. गेल्या 31 ऑगस्टला सकाळी अकराच्या सुमारास संशयित काशीनाथ शिंदे, भगीरथ म्हसणे, रामचंद्र गुंजाळ, संपत वाजे, खुशाल चव्हाण, रवींद्र गव्हाणे कार्यालयात घुसले. त्या वेळी कार्यालयात पीडित महिला असताना त्यांच्याकडे अश्‍लील नजरेने पाहात संशयितांनी पैशांची मागणी केली. अश्‍लील शब्दप्रयोग करीत संशयितांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांत सहा संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

दुसरी घटना हिरावाडीत..

महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीच्या फिर्यादीनुसार, संशयित हिरावाडी ते के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत सारखा तिचा पाठलाग करीत होता. त्याने पीडित युवतीशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला आणि हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत विनयभंगासह पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT