Manikrao Gavit, Surup Singh Naik, Batesinh Raghuvanshi, Adv KC Padvi, Chandrakant Raghuvanshi, Dr. Vijayakumar Village esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Election : चाळीस वर्षानंतर राजकारणाचे केंद्रबिंदू बदलले; नवापूरची जागा घेतली नंदुरबारने

Nandurbar News : नंदुरबारच नव्हे; तर धुळे जिल्ह्याच्या राजकारणातील निर्णय थेट नवापूरमध्येच होत असत. असे चित्र गेली ४० वर्षे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबारच नव्हे; तर धुळे जिल्ह्याच्या राजकारणातील निर्णय थेट नवापूरमध्येच होत असत. असे चित्र गेली ४० वर्षे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे. राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले नवापूर आता राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने मागे पडले आहे. आता नंदुरबार हेच राजकारणाचे केंद्रबिंदू बनले असून आता नवापूरवासियांनाच राजकिय निर्णयासाठी नंदुरबारमध्ये यावे लागत आहे. (Nandurbar Lok Sabha Election)

सत्ता ही येते व जाते. ती कधीही एकाकडे राहत नाही. मात्र मिळालेल्या सत्तेचा आणि अधिकाराचा उपयोग राजकारणात कसा करावा, त्यातून जनसंपर्क वाढवून जनतेच्या हिताचे निर्णय कसे घ्यावेत, जनहितासाठी कोण उजवा ठरू शकेल, याचा अभ्यास असणे राजकारणात सर्वात महत्वाचे असल्याचे मत राजकीय मंडळींनी व्यक्त केले आहे.

त्याच संधीचा फायदा व पक्षाने दाखविलेला विश्‍वास कायम अबाधित राखत नवापूरचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व दिवंगत खासदार माणिकराव गावित यांनी राजकारणात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सख्खे भावंडेही एवढा जिव्हाळा एकमेकांना लावणार नाहीत, अशी पक्की मैत्री या दोन नेत्यांची होती. त्यांनी पक्षासाठी केलेले काम हिच त्यांची पावती होती.

त्यातूनच त्यांचे इंदिरा गांधी ते राहूल गांधीपर्यंत गांधी घराण्याशी थेट संबंध होते. त्यामुळे केंद्रीय व राज्यातील कोणतेही काम असेल अथवा राजकीय घडामोडी असतील, त्या नवापूरच्या या नेत्यांच्या संमतीनेच घडत असत. त्यामुळे केवळ धुळे -नंदुरबार -जळगावच नव्हे; तर राज्यातील राजकीय उलथा-पालथीपासून वेगवेगळे राजकीय महत्वाचे निर्णय नवापूरातच होत असत.

म्हणून राज्याचे नेते नवापूरात ठाण मांडून बसत असत. ही वस्तूस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. या दोघा नेत्यांचे तिसरे नेते म्हणजे स्व. बटेसिंहदादा रघुवंशी हे होत. तिन्ही नेत्यांचा समविचारातूनच सरपंचापासून तर विकास सोसायटीचा चेअरमन असो की जिल्हा बॅंकेचे पदाधिकारी,पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण हेही या नेत्यांचाच निर्णय शिरसावंद्य मानला जात होता. (nandurbar political news)

आज परिस्थिती बदलली आहे. कॉंग्रेसचे नेते दिवंगत बटेसिंहदादा यांचे निधन झाले. त्यानंतर माणिकराव गावित यांचे निधन झाले. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे वयोवृध्द झाले. त्यामुळे या तिन्ही नेत्यांची राजकारणातून एक्झिट झाली. दिवंगत खासदार माणिकराव गावित यांच्यानंतर त्यांचे पुत्र भरत गावित भाजपात गेले.

त्यांचा सामंजस्याच्या स्वभावामुळे ते राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देतात म्हणून ते अद्याप राजकारणात नेते म्हणून पुढे आले नाहीत. तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक हे नवापूरचे आमदार आहेत. कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र पक्षात व राजकारणातही ते केवळ अन् केवळ नवापूरपुरतेच मर्यादित राहिले आहेत.

त्यांना संधी आहे मात्र त्याचे सोने करणे त्यांच्या हातात आहे. मात्र तसे अद्याप तरी झालेले नाही. लोकनेते बटेसिंहदादा यांचा वारसा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चालवित आहेत. त्यांनी मात्र परिस्थितीजन्य निर्णय घेत आपल्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागू दिला नाही. ते जिल्ह्याचे नेते होते व आजही नेतेच आहेत.

त्यांचे कार्यालय त्यांच्या पक्षाचेच नव्हे; तर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. इतर पक्षांचेही नेते नंदुरबारातच असल्याने नवापूरऐवजी नंदुरबारच आता राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. भाजपचे केंद्रबिंदू मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा बंगला तर कॉंग्रेसचे केंद्रबिंदू आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या बंगला बनले आहेत. तेथूनच राजकीय हालचाली गतिमान होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : लगोरीने काच फोडून मोटारीतील ऐवज पळविला,कोल्हापुरातील प्रकार; चोरीची रक्कम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Hemorrhoid Risk : बाथरूममध्ये मोबाईल वापरताय? फक्त आजार नाही...तर मोठ्या रोगाकडे घेऊन जातीये 'ही' सवय, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Abhishek Sharma New Car : अभिषेक शर्माने घेतली नवी 'Ferrari Purosangue', किंमत अन् फिचर्स ऐकून डोळे पांढरे होतील...

SCROLL FOR NEXT