Abhijit Patil Jaipal Singh Rawal and activists cheering for victory at Abhijit Patil's Gangotri residence in the city. In the second photograph, activists displaying posters of Abhijit Patil and Jaipalsingh Rawal as kingmakers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Shahada Assembly Constituency : काँग्रेसच्या विजयात ऐतिहासिक भूमिका; तापी नदीकाठावरील दोन्ही दादा ठरले ‘किंगमेकर’

Assembly Constituency : काँग्रेसच्या विजयाच्या इतिहासात पहिल्यांदाच शहादा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा ठरला.

कमलेश पटेल

Shahada Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दहा वर्षांनंतर दलित, आदिवासी, मुस्लिम मतदार यंदा पुन्हा काँग्रेससोबत जोडला गेल्याने शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी यांना तब्बल ४५ हजार ७६६ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसच्या विजयाच्या इतिहासात पहिल्यांदाच शहादा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा ठरला. काँग्रेसकडे ठळक नेता नसतानाही तापी नदीकाठावरील दोन्ही दादांनी कार्यकर्त्यांसमवेत व इतर सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत जिवाचे रान करत विजयश्री खेचून आणली. ()

नेत्यांची कमतरता असतानाही शहादा विधानसभा मतदारसंघातील मतदार काँग्रेसच्या पारंपरिक मतदार काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याने काँग्रेसच्या विजयात ऐतिहासिक भूमिका शहादा मतदारसंघाने निभावली. ‘सत्ता तिथे कार्यकर्त्यांचे वलय’ हे सर्वश्रुत आहे.

तालुक्यात सत्ताधारी भाजपकडे आमदार तसेच बड्या नेत्यांचे वलय असतानाही त्या मानाने तालुक्यात काँग्रेसकडे सुरवातीला तुल्यबळ नेता नसल्याने एकतर्फी वाटणारी लोकसभेची निवडणूक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील या तापी नदीकाठावरील दोन्ही दादांनी काँग्रेसच्या प्रचाराची सूत्रे हाती घेत चांगलीच गाजविली.

रात्रंदिवस मेहनत करून यश पदरात पाडून घेतले. लोकसभेचा निकाल तालुक्यातील आगामी राजकारणाला निश्चितच कलाटणी देणारा ठरला असून, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना चिंतन करणारा ठरला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारण या निवडणुकीत सरस ठरल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. एकूणच काँग्रेसच्या ॲड. गोवाल पाडवी यांच्या विजयामध्ये तापी नदीकाठावरील दोन्ही दादा ‘किंगमेकर’ ठरले.

शहादा तालुका हा विधानसभेला नंदुरबार व शहादा या दोन मतदारसंघांमध्ये विभागल्याने तालुक्याला दोन आमदार लाभले आहेत. शहादा-तळोदा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी व नंदुरबार मतदारसंघात विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे दोन्ही आमदार सत्ताधारी भाजपचे असल्याने साहजिकच त्यांनी केलेली विकासकामे, कार्यकर्त्यांचे वलय पाहता तालुक्यातून भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना अधिक मताधिक्य राहील, असे बोलले जात होते.

त्यातच काँग्रेसचे माजी पालकमंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पी. के. अण्णा पाटील गटाचे दीपक पाटील व त्यांच्या अनुयायांचे पाठबळ व सर्व काही लवाजमा असतानाही मतदारांनी भाजपच्या डॉ. हीना गावित यांना हॅट्‍ट्रिकची संधी न देता सपशेल नाकारून नवख्या गोवाल पाडवी यांना संधी दिली.

दोन्ही दादांची सहकाऱ्यांसोबत झुंज

नंदुरबार लोकसभा निवडणूक जाहीर होताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील यांनी ॲड. गोवाल पाडवी यांना पाठिंबा देत मतदान होईपर्यंत सहकाऱ्यांचा मदतीने रात्रंदिवस एक करत सभा, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी घेत आपणच उमेदवार आहोत, या ताकदीने संपूर्ण मतदारसंघ ॲड. पाडवींसाठी पिंजून काढत विजयश्री खेचून आणली.

गेल्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. हीना गावित यांच्या विजयासाठी याच दोन्ही दादांनी कठोर मेहनत घेतली होती आणि त्या वेळी डॉ. गावित विजयी झाल्या होत्या. परंतु या निवडणुकीत त्यांनी जाहीर राजकीय विरोध पत्करून ॲड. पाडवींना मदत केली. गोवाल पाडवींच्या झालेल्या विजयावरून तापी नदीकाठावरील या दोन्ही दादांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. (latest marathi news)

काँग्रेसला ऊर्जितावस्था

गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये जिल्ह्यात प्रभारी राज चालू आहे. कार्यकर्त्यांमध्येही मरगळ भरली होती. परंतु लोकसभेचा या विजयानंतर पक्षाच्या नवीन जन्म झाला असून, काँग्रेसला पुन्हा तालुक्यात ऊर्जितावस्था येण्याची चिन्हे दिसत आहेत. या लोकसभा निवडणुकीचा निकालाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा व पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

शहाद्याचा सिंहाचा वाटा

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांच्या विजयात शहादा मतदारसंघाच्या सिंहाच्या वाटा ठरला. लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघातून काँग्रेसला सर्वाधिक ४५ हजार ७६६ आघाडी मिळाली. २०१४ मध्ये भाजपला १६ हजार ६२३ मतांची, तर २०१९ मध्ये एक हजार ६६६ मतांची आघाडी भाजपला मिळाली होती.

त्या वेळी काँग्रेस पक्ष पिछाडीवर होता. यंदा मात्र ॲड. पाडवींच्या मताधिक्यामध्ये शहादा विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ४५ हजार ७६६ मतांचा सिंहाचा वाटा आहे. पुन्हा काँग्रेसमय शहादा विधानसभा मतदारसंघ होताना दिसत आहे. मतदारसंघातून काँग्रेसला एक लाख ३९ हजार ७२५, तर भाजपला ९३ हजार ९५९ मते मिळाली.

काँग्रेसच्या विजयात राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी व त्यांचे सहकारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, राष्ट्रवादीचे एन. डी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख जाहीर शेख मुशीर, दीपक पटेल, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे आदींसह सहकारी घटकपक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

भाजपच्या पराभवाची कारणे

-गावित परिवाराने ठराविक लोकांना दिलेले महत्त्व. -ग्रामीण भागामध्ये सरपंचांमध्ये असलेली नाराजी.

-पक्षांतर्गत कुरघोडी.-नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव.

-नेते जास्त, कार्यकर्ते कमी.

काँग्रेसचे विजयाचे गणित

-जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवी संजीवनी निर्माण केली.

-गेल्या दहा वर्षांपासून नंदुरबार विधानसभेत भाजपच्या आमदार असताना पराभव.

-जिल्ह्यातील रोजगार स्थलांतरासह शेतीशी निगडित मुद्दे प्रचारात ठरले प्रभावी.

-दिग्गज नेते नसतानाही मतदारांनी दिलेली साथ.

-केंद्रातील प्रचाराचे मुद्दे. संविधान बदल, वनजमिनी हक्क आदी मुद्द्यांचा वापर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT